पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) श्रीरामदासकृत तुरे लाविले घातल्या पुष्पमाळा । कितीएक त्या रत्नमाळा सुढाळा ।। करी कंकणे मुद्रिकी लेववील्या। यथासांग सर्वांस संपूर्ण केल्या ।। ६० ।। सभामंडपी फांकल्या रत्नकीळा । समस्तांसि ते जाहली सौख्यवेळा॥ कितीयेक सांगीतल्या गुप्त गोष्टी । माहावीर आनंदले सर्व पोटीं ।। ६१ ॥ स्तुतीउत्तरी सर्व लावण्यखाणी । मुखे बोलिला राम कारुण्यवाणी ॥ तुम्ही कष्ट केले जिवी सर्व भावे | तुम्हांलागि म्यां काय उत्तीर्ण व्हावें ॥ ६॥ कपी सनिवा अंगदा जांबवंता । गजा मारुता आणि नैऋत्यनाथा ॥ समस्तांसि सन्मानिले रामचद्रे । सुधाउत्तरी तोषवीले नरेद्रे ।। ६३ ॥ मखें बोलिजे वैद्यराजासि देवे । कपी तज ऊचीत म्यां काय दा वरू दीधला रामचंद्रे उचीती। तझ्या दर्शने लोक आरोग्य होती। समस्तां कडे पाहिले राघवाने । तयां सर्व रोमांच आले फराणे ।। नमस्कारिले स्वामि देवाधिदेवा । ह्मणे राम तो लोभ आतां असावा ॥६५॥ असंभाव्य केली स्तुती राघवाची । वदों लागली मंडळी प्रेमळांची ।। कपी बोलती सर्व कारुण्य वाचा । स्तुती ऐकतो राम सिंधू सुखाचा ।। ६६ ।। गिरी कंदरा माज आमी असावे । नरां देखतां वानरी शीघ्र जावे ।।। समर्थे सवे लाविली मर्कटांला । महा सकृते पार नाहीं सुखाला ।। ६७ || प्रभू बोलणे चालणे काय जाणे | बरे वोखटे सर्व कांहींच नेणे । बहूतां परी चालवीले दयाळे । तम्हां योग्य हे आमुचे तोड काळे ।। ६८ ॥ कृपाळूपणे राघवे थोर केलें । बरे वोखटें सर्व साहून नेले ।। बहू देखिले सौख्य नाना परीचे । प्रभच्या पदालागि हे प्राप्त कैचे ।। ६९ ॥ सभाग्याचिया संगतीने असावें । बहुतां परीचे बह सौख्य द्यावे ।। तया सारिखें सर्व आम्हांसि जाले । महा वैभवे चित्त सखे निवाले ।। ७० ।। नव्हे भेटि नाना परी योगयागें । नव्हे भेटि नाना परी भोग त्यागे || नव्हे भेटि ब्रह्मादिकां शीघ काळे । त्रिकटाचळी दाखवीले भपाळे ।। ७१ ॥ कपी रीस ते बोलती दैन्यवाणे । कृपासागरू जीविंचा भाव जाण ।। तयांच्या शिणे देव तो शीणताहे । बहुतां परी राम संबोखिताहे ।। ७२ ॥ सवे लागली राघवाची सुटेना । प्रिती गतली तोडितां ही तुटेना ।। बहू दीस गेले सुखाचेनि योगें । अकस्मात ते दुःख जाले वियोगें ।। ७३ ॥ प्रभू संगतीची सवे दृढ केली । अकस्मात कां सर्व छेदनि नेली ।। तयां बोलता जाहला रावणारी । तम्हां भेटि देईन कृष्णावतारी ।। ७४ ।। ६८. मुद्रिका=आंगठ्या.३९. उत्तीर्ण-उतराई, ७० वैद्यराज सण नामक वद्य.01. सो संचय.