पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. समस्ती प्रभूला नमस्कार केले । पुढे सर्व ही हात जोडूनि ठेले ।। ४५ ॥ समस्ती विरी रामगूणागराला । बहू प्रार्थिले त्या दयासागराला ।। समस्तांसि देवें निरोपासि द्यावे । म्हणे राम तो शीघ्र नेऊनि जावे ।। ४६ ॥ नमस्कार केले तया विश्ववंद्या । पुढे शीघ्र संपादिली स्नानसंध्या ।। असंभाव्य ती दिव्य अन्ने सुवासें । बहू पंगती घातल्या सावकाशे ॥४७॥ ऋषी राम ते सर्व ही बंधुवर्गी। कितीयेक ते बैसले आप्तवर्गी ।। प्रभा फांकली दिव्य रत्नी अनीं । कपीरीस ते बैसले जेचि स्वर्गी ॥४८॥ हरी क्ष राक्षेस सर्वे मिळाले । असंभाव्य ते भोजना लागिं आले ।। बहू पाकनिष्पत्ति नानापरीची । पक्वान्ने रसाळे कळाकू सरीची ।। ४९ ॥ जगज्जननी जानकी वाढिताहे । सुवासे महासौख्य ते होत आहे || यथासांग संपूर्ण ते अन्न जालें । पुढे शीघ्र तें शर्करा आज्य आले ॥ ५० ॥ पयादीक नाना रसें पूर्ण पात्रं । त्वरे घेतले ग्रास राजीवनेत्रे ।। समस्तांसि आज्ञापिलें देवधीशे । कपी सर्व ही गर्जती नामघोष ।। ५१ ॥ तयां जेवितां जेवितां भक्ष्य बाले । पुन्हा मागुती खाद्य ऊदंड आले ।। घते वादितां वादितां वोघ गेले | असंभाव्य नाना परी तृप्त केले ।। ५२ ॥ अपेक्षी तया मागती सर्व शाका । कितीएक ते आणचीती कथीको । क्षिरी लोणयों रायती भात भः । खुणा दाविती मागती एक लक्षे ।। ५३ ।। जळे शीतळे सर्व ही सेविताती । पुन्हा मागुते वीर ते जेविताती || समस्तांसि ती सांग संपूर्ण जाली । पढें शीव दध्योदने आणवीली ॥ ५४ ॥ बह जेवितां नेवितां येक मध्ये । प्रताप मुखे बोलती श्लोक गये ।। मनी भासती अर्थ नाना परीचे । मुखे रामनामे महद् घोष वाचे ॥ ५५ ॥ समस्तांसि ते सर्व संपूर्ण जाले । महातप्तिने लोक सूखें निवाले ॥ वरी आच्मने शुद्ध केली खळाळां । कितीएक ते तोय घेती घळाळां ।। ५६ ॥ सभामंडपी सर्व ही स्वस्थ जाले । सुगंधी विडे शीघ ते आणवीले ॥ समस्तांसि संपूर्ण गंधे सुवासे । कपी पूजिले सर्व नाना विलासें ।। ५७ ॥ समस्ती विडे घेतले पीत पणे । सुपारी बरी कर्पूरू मुक्तचूणे ।। बह वेळ लौंगा सुवासे खंदारे । किती जाति कंकोळ नाना प्रकारे ।। ५८ ॥ अळंकार चीरे बह सिद्ध केली । असंभाव्य दिव्यांबरे आणवीली ॥ बहू भूषणांचे बहू ढोग केले । जगज्जनके ते कपी गौरवोले ।। ५९।। ६.. हरी-वानर. ६१. क्ष-आस्वल. ६२. कथिका कढी. ६३. पीत पण पिकलेली विड्याची पानें. ६४. मुक्त चूर्ण मोत्यांचा चुना. ६५. वेळवेलदोडे (स.. एला..). ६६. खदीरकात, ६७. जातिजायफळ.