पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत कितीएक ते भोवती भेद नाना । भ्रमों लागले पाय भूमी स्थिरना ।। कितीएक ते टीपऱ्या खेळताती | मिळाले समेळे बहू वाजताती ॥ ३० ॥ घने सुस्वरें नाद कल्होळ जाला । बहुतां परीचा बह लोक आला || महद्भूत ते मांजली रंग वेळा । दणाणी मही नाद गेला भुगोळा ॥ ३१ ॥ निशी प्राप्त जाली असंभाव्य दाटी। बहू दीवट्या लक्ष कोटयानुकोटी । कितीएक ते उंच नेले उमाळे । नळे जाळितां घोष तैसे उफाळे ॥ ३२॥ सरारा फुले धांवती अंतराळी । कडाडीत घोषे निराळी निराळी ॥ भुरारां हाया कितीएक वेळां । बळे पाहती उर्ध्व नक्षत्रमाळा ॥ ३३ ॥ बहू औषधे दिव्य नाना परीची। कितीएक तेजाळ ती कूसरीची ॥ घडीने घडी तेजपुंजाळ होती । उजेडे चि ते लोक लोकां पहाती ।। ३४ ॥ पुढे ऊठिला राम तो ते प्रसंगी । प्रभ चालिला भवनामाजि वेगी ।। समस्तांसि आरोगणा सांग केली । विडे कपरे घेतले ताप्ति जाली ।। ३५ ॥ गृहे दोधली रम्य दिव्यांबरांची। दळे स्वस्थ जाली रिसांवानरांची || कपी वीर राक्षेस सूखे निघाले । सषप्तीचियों भवनामाजि गेले ॥ २६ ॥ सुवर्णाचिया मंचकी मदु शय्या । वरी सुमने सेज त्या देवराया ॥ सभामंडपी ते निशी अर्ध गेली । प्रभने यथासांग विश्रांति केली ॥ ३७॥ निजेले ऋषी राव तो बंध माता । यथायोग्य विश्रांति जाली समस्तां ।। किताएक त्या वीरफौजा समस्ती । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ वस्ती ।। ३८॥ प्रभातींचि ऊठोनियां नित्य नेमे । किजे स्नानसंध्यादिके सांग कम ॥ किती एक दाने कितीका परींची । धने कांचने भव्य नाना परीची ॥ ३९॥ अळंकार मुक्ताफळे मुक्तमाळा । कितीएक दिव्यांबरे रत्नमाळा ॥ कितीएक धोत्रे कितीएक पात्रे । दिली ब्राह्मणा दान राजीवनेत्रे ॥ ४० ॥ कितीएक कोट्यावधी गोधनांची । कितीएक लक्षावधी कुंजरांची || बळाचे बहू अश्व ते पारखीले । धनेशी द्विजा ब्राह्मणां दान केले ॥ ४१ ।। ऋषी बांधवी सारिली स्नानदाने । यथायोग्य उंचासने स्थान माने ।। सभेमाजि तो बैसला राम राजा | निघाल्या कपी सि राक्षस फौजा ।। ४२ ।। कपीनाथ तो अंगदु जांबुवंतू । कमद गज बीनतू वीर्यवंतू ।। महावीर लंकापती मारुती तो । समख द्विवीद् कपी केसरी तो ॥ ४३ ।। प्रमाथी गवायू निळू हेमकूटू । सुषेण नळू मंद मोठा अचाटू । कपी क्रोधनू ऋषभू आणि शर्भू । गवाक्षं दधीमूख स्वेदू शराभू ॥ ४४ ।। कपी रीस राक्षस कोट्यानुकोटी । असंभाव्य ते चालिले रामभेटी || ५८, हवाया-चंद्रजोती. ५९. सुषुप्ति-झोंप.