पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. ऋषी सांगती हे बरी शुद्ध वेळा । त्वरे बैस भैद्रासनी तूं नृपाळा ॥ समस्तांसि आनंद राज्याभिषेके | ऋषी अक्षता टाकिती मंत्रघोषे ।। १५ ।। विधीयुक्त भद्रासनी रामराजा । यथायोग्य संपादिली सांग पूजा ॥ कितीएक पुष्पांनळी वाहताती । सानंद आनंद सूखें पहाती ॥ १६ ॥ असंभाव्य नाना परी दान केले । बहूतां परी याचका तोषवीलें ।। गिरीचे परी शर्करा ढीग केले । कितेकी समस्तांसि ते पाठवीले ।। १७ ॥ नभी दाटली मेघडंब्रे अपारे । कितीएक ती चामरे थोरथोरे ।। असंभाव्य हेलावती रत्नपच्छे । बह डोलती उन्मते शक तुच्छे ॥ १८ ॥ सचित्र विचित्रे रवीतेजपत्रे । असंभाव्य ती दाटली भव्य छत्रे ।। विशाळा पताका सतेजे निशाणे । वरी सर्व आच्छादिले व्योम तेणे ॥ १९ ॥ असंभाव्य ते दाटली भीमसेना । प्रसंगें विरी घाव केला निशाणा ।। महादिव्य सिंहासनी रामराजा । पहाया भ्रमों लागल्या वीर फौजा ॥ २० ॥ बरी रामराजे गुढी ऊभवीली । गजेबे* सुखे लोकमांदी मिळाली ॥ झडा घालिती राम पाहावयाला । समस्तां मनी थोर आनंद जाला ।। २१ ॥ पुरीमाजि ती वैभवाची अचाटे । दाळी तिताळी उभी लोक-थाटें | खणा दाविती सांगती येकमेकां । बहवीध तो राम वेधी अनेकां ।। २२ ।। दमामे धमामे दडाडां धडाडां । बह याजती चंड भेरी भडाडा ॥ तुतारे नगारे बहू शंख शंगें । किती चौघडे ढोल कर्णे बुरंगें ॥ २३ ॥ तुरे गंभिरे ती बह गर्जताती । कितीएक पांवे मुखीं घोष वाती ।। नफैन्य बहू दुंदुभी घोष जाला । असंभाव्य तो वाद्यमेळा मिळाला ॥ २४ ॥ कितीएक ते चौघडे वाजताती । कितीएक ते बागडे नाचताती ।। कितीएक ते मागुते मेळ आले । कितीएक ते वेषधारी मिळाले ।। २५ ॥ कितीएक थाने कळावंत गाती । हरीदास ते कीर्तनी गर्जताती ॥ कितेकी गुणी नाँचणी नत्यरंगे । अलापे कळा रागरंगे तरंगें ।। २६ ॥ कितीएक वाखाणिती भाट ब्रीदे । कितीयेक ते छंद नाना विनोदे | दिडीगान ते मांडिले वासदेवी । बह कीनन्या लाधले लोक जीवीं ।। २७ ॥ कितीएक ने भैरवाचे मिळाले । कमाचे कितीयेक घेऊनि आले ॥ किताएक ते नाचताती धबाबां । सखे डोलती वाजवीती खबाबां ।। २८॥ कितीएक ते गारुडी नाचताती। गळे फगले घागऱ्या लोळ घती ।। कितीएक ते लोक नाना गणांचे । बिदें अंकुशें लाविले भार कुंचे ।। २९ ।। ५४. भदासन=सिंहासन. रत्नपच्छे-मत्स्य पुच्छे शक-शुक्र ५५. * गजेब-गजबजे. इताळी-दुमजल्यावर. ५६.तिताळी-तिमजल्यावर. ५७. नाचणी-नाचणान्या स्त्रिया.