पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत तेरावा प्रसंग प्रारंभ. परी वर्णिली हो यथासांग येथे । परी पाहतां दीसते अल्प तेथे ॥ मनी संशयो श्रोतयां प्राप्त जाला । प्रतीउत्सरे काय दिल्ही तयांला ।। १॥ अयोध्यापुरी स्वर्गलोकासि गेली | पुढे वोस होतां चि ते भन्न जाली ।। असेना जना राहणे वस्ति जेथें । खडे माणिके कोण ठेवील तेथे ।। २ ॥ पुरे पट्टणे वास होती कितेकें । पुढे पाहतां दीसती सर्व टेके ।। युगें लोटतां ही वसे अल्प काहीं । असंभाव्य हे तूं विचारूनि पाहीं ।। ३ ।। असो तूटला संशयो श्रोतयांचा । पुढे राहिला वोध जातां कथेचा ।। अयोध्यापुरा चालिले वीर जेठी । निघाले स्वये भार कोट्यानकोटी ।। ४ ॥ ऋषी राम ते चालिले नीज भारे । दळे चालिली पृष्टभागी अपारे । शिबीका पुढे चालती दिव्य हारी । सखे लोक बंधू मधे रावणारी ।। ५ ॥ पुढे दाटले भार महारथांचे । दळी घोष जाले गनां घोडियांचे ।। गिरीतुल्य सेना रिसांवानरांची । बह दाटि राक्षेम लंकापतीची ।। ६ ।। पुरी पावतां रुंधल्या सर्व वाटा । असंभाव्य तो जाहला दाट खेटा ।। शतांची शतें धांवती वेत्रधारी | दळे माजली कोण कोणास वारी ।। ७॥ कितीएक ग्रामस्थ मध्ये चि गेले । कितीएक ते चूकले भ्रांत जाले ॥ अयोध्यापुरीमाभि ऊभी अचाटें । गहें गोपुरे पाहती दाट थाटे ॥ ८ ॥ करी रत्नताटे कितीएक हारी । असंभाव्य त्या चालिल्या दिव्य नारी ।। बहूसाल नीराजनें लक्ष कोटी । पुरींतूनि येतां पुढे थोर दाटी ।। ९ ।। रुपे राजसा सुंदरा त्या प्रितीने । रघुनाथ ओवाळिती आवडीनें ।। मनामाजि ते लागलीसे अवस्था । सखे पाहती येकपत्नीव्रतस्था ।। १० ।। करीती बहू सुंदरा अक्षवाणे । कितीएक ओवाळिती निंबलोणे ।। असंभाव्य "योवे तया नायकांचे । मखें गर्जती भाट वेतीळ वाचे ।। ११ ॥ पताका निशाणे बहूरंग वर्ण । महातेजपुंजाळ मार्तंडपणे ।। वरी दाटली ती असंभाव्य छेत्रे । भ्रमों लागली दिव्य छत्रे विचित्रे ।। १२ ॥ पहा हो पहा पैल तो राम आला । असंभाव्य हा वीर मेळा मिळाला ।। दिसेना पुढे पाहतां गर्द जाला । समस्ती करे ताळिकाघोष केला ।। १३ ।। पुढे सर्व ही भूवनामाजि गेले | महावीर ते बैसले स्वस्थ जाले । पुरीमाजि आनंद साँस जाला । उभे राहिले भाग्य हे राम आला ।। २४ ॥ १९. रावणारी राम. ५०. क्षेत्रधारी-छडीदार, चोपदार. ५१. थोथवे. ५२. वेताळ- स्ततिपाठक (सं. वैतालिक). ५३. मार्तड पण छत्रया.