पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड, (९५) गृहे रम्य अंतर्गहें हाटकाची । बहू हांसल्या पूतळ्या नाटकांची ।। भुयारे घरे वीवरे गुप्त द्वारें । स्थळें भव्य बैसावया थोरथोरें ।। ९३ ॥ सभामंडपों ते असंभाव्य शोभा । बह शोभतो हेमकल्लोळ गाभा ।। फुलारे बहू लाविले माणिकांचे । कितीएक ते घोस मुक्ताफळांचे ॥ ९४ ॥ महो-मंडळी तेज पुंजाळ जाले । असंभाव्य तें सर्व लावण्य आले ।। विशाळा स्थळां निर्मिल्या भव्य भिती | निळे पाच गोमेद ते ढाळ देती ॥ ९५ ।। बहू रत्न पुंजाळले ज्वाळ जैसे । असंभाव्य हारी उभे स्तंभ जैसे ।। विशाळे स्थळे निर्मिली जाड कैशी । सुवर्णाचळामाजि विस्तीर्ण जैशी ।। ९६ ॥ विचित्रा कळा कूसरी लेखनाच्या । बह रत्नमंडीत त्या कांचनाच्या ॥ सभामंडपी फांकल्या रत्नकीळा | दिसे रंग तेथे निराठा निराळा || ९७।। कितीएक ती फांकली दिव्य किण । बहूतां परींची बहू रंग वणे ।। कितीएक हेलावती हेमपणे । कितीएक घंटावळी त्या सुवर्णे ।। ९८ ॥ स्थळे शोभती रम्य बैसावयाची । बहसाल ती भिन्नभिन्नां परीची ॥ कितीएक ती रत्नमंडीत याने । कितीएक सिंहासने ती विमानें ॥ ९९ ।। बह बेसका दिव्य रम्यांबरांच्या । विचित्रा बहरंग नाना परीच्या ॥ वरी लोबती घोस मुक्ताफळांचे । कितीएक मुक्तावळी जाळियांचे || १०० ॥ किनीएक रत्नावळी रम्य कैशा । कितीएक मुक्तावळी शुक्र जैशा || प्रभेचे बहू घोंस हेलावताती । बहूतां परीच्या बहू रत्नजाती ।। १०१॥ स्थळे निर्मिली रम्य विस्तीर्ण नाना । कितीएक बैसावया सर्व सेना ।। कितीएक विस्तीर्ण राजांगणे तें । भमी पाचबंदी महा रम्य तेथे ॥ १०२ ।। काठ माड्या सजे मोठमोठे । उभे राहिले भव्य ब्रह्मांड वाटे ।। असंभाव्य चर्या लघ पंथ हारी । नभा भासवी रूप नाना विकारी ।। १०३ ।। झरोके कितीयेक त्या गुप्त वाटा । किती जपऱ्या अंतराळी अचाटा ।। कितीएक त्या भक्ति संख्यारसाच्या । कितीएक त्या उंच तेरा खणांच्या ॥१०४॥ रत्नकळ्साचिया रम्य वोळी । रवीकीर्ण तशा कळा अंतराळी ।। चरी लागल्या सर्व नक्षत्रमाळा । मनी भासती फांकती दिव्य कीळा ।। १०५ ।। रवीबंशिचे स्वर्ग विख्यात राजे। तयांच्या प्रतापे विधीगाळ गाज ।। करी कोण संख्या तया वैभवाची । उणी वर्णितां बुद्धि ब्रह्मादिकांची ।। १०६ ।। किती कोण लेखा मला मानवाला । मतीमंद मी काय वणू तयाला ॥ म्हण दास त्या अल्पशा भक्तिभावें । प्रभू बाबड्या उत्तरी तोषवावे ॥ १०७ ।। १६. राजांगणा-मुख्य अंगण; दुसरी उदाहरणे, राजविद्या, राजगुह्य, रायआंवळी, १७. झरोके-खिडक्या.४८. उपन्या-माड्या.