पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत तडागे जळे निर्मळे कप बावी । सदा सर्वदां राहिजे मानुभावी * ।। स्थळे निर्मळ निर्मिली पावनाने । कितीएक कल्पतरूंची उद्याने ।। ७८ ॥ कितीएक त्या लागल्या वृक्षजाती । वने वाटिका जीवने पुष्पजाती ।। अयोध्यापुरी रम्य लावण्य नावे । महा रम्य विस्तीर्ण ते वीस गांचे ।। ७९ ।। गहें बांधिली ती असंभाव्य उंची। कितीएक ती पंच सप्ता खंणाची ।। सजे चौक दामोदरें थोरथोरें । विशाळे विचित्रे गवाक्षे अपारे ।। ८० ।। बिदी हाट बाजार चौबार कुंचे । असंभाव्य ते भव्य नाना परीचे ।। कितीएक ती सारखी दीसताती । महा धूर्त ते ही बळें भ्रांत होती ।। ८१ ।। गृहे गोपुरांचा बहू दाट खेटा । हुडे माडिया ऊपरा त्या अचाटा ।। महदाम्य श्रीमंत ते लोक तेथे । सदा सर्वदा दाटणी थोर पंथे ।। ८२ ॥ पुरीमाजिचे लोक आरोग्य भारी । मले लेकरे थोरले आणि नारी ।। करंटे तयामाजि कोणीच नाही नसे द्वेष ना मत्सरू सर्व काही ।। ८३ ।। सदानंद उद्वेग नाहीं जनाला । नव्हे वृद्ध ना मृत्यु नाही तयांला ।। कुरूपी महामूर्ख तेथे असेना | सखाचे जिणे दैन्यवाणे दिसेना || ८४ ।। पुरीमाजि ते सर्व ही लोक कैसे | सवर्णाचळी नांदती देव जैसे || प्रतापी बळाचे सदां सत्य वाचे । पुरीमाजि लावण्य देहे जनांचे ॥ ८५ ।। बहू नोतिन्याये विवेके उपाये । कदा ही तया बाधिजे ना अपाये ।। बहुतां धनांचे उदारा मनांचे । विशेषा गणांचे गणी सज्जनांचे || ८६॥ पुरीमाजि त्या सर्व चातुर्य मोठे । कदां ही मनी नावडे त्यासि खोटें ।। विलासे वसे राम आणीक विद्या ! कळा सर्व साधारणा सर्व साध्या ।। ८७ ।। अळंकार दिव्यांबरे सर्व लोकां । सदां प्रीतिने बोलती एकमेकां ।। महा वैभवाचे बहू सूकृताचे । परीमाजि ते लोक नानागुणांचे ।। ८८ ।। पुरीमाजि ते दाटणी मंदिरांची। रिकामी भुमी ते रहायासि कैची ।। तया मध्यभागी असंभाव्य तेथें । महा भवन उंच आकाश पंथें ।। ८९ ।। गहें गोपुरे निर्मिली कांचनाची। बहसाल विश्रांतिदाती मनाची ।। महारत्नमंडीत ती थोरथोरे । किती धाकटी भव्य मोठी अपारे ।। ९० ॥ भुमी बांधल्या पांच बंदी विशाळा | मनोरम्य त्या रेखिल्या चित्रशाळा ।। कितीएक दारे लघू थोरथोरें । स्थळे दिव्य ती पाहतां सौख्यकारें ।। ९१ ।। किती अन्न शाळा किती वस्त्रशाळा । कितीएक विस्तीर्ण त्या होमशाळा ।। किती नाट्यशाळा बहू रत्नशाळा । कितीएक त्या धर्मशाळा विशाळा ।। ९२ ।।

  • मानुमावौं महानुभावी थोर मनाच्या परुषांनी.१४. वीस गांवें वीस योजने. १५.

गुप्तां क्षणांची-सात मजली.