पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. पुढे ब्राह्मणी मांडिली धर्मचर्चा | मुखे बोलती धन्य दीनू सुवाचा ।। ६२ ।। पुढे दोन तो चालिला अस्तमाना । नमायासि आली असंभाव्य सेना ।। कितीएक ती दीवट्यांची अचाटे । सभामंडपी चालली दाट याटे ।। ६३ ।। प्रसंगी तये वाद्यकल्लोळ जाला । दुरस्ता बह लोक सूखे मिळाला ॥ विराजे सभेमाजि तो रामराजा । पुढे चालिल्या त्या कळावंत फौजा ।। ६४ ॥ झणाणीत वीणे मनोरम्य नाद । दणाणीत मुर्दैग गंभीर शब्दे ॥ अला कळा दाविती रागमाळा । सरे सुस्वरे माजली रंगवेळा ।। ६५ ॥ बहू ताळ कल्लोळ वाजे खणाणां । विणे याजती तंतुनार्दै झणाणा | बहू गीत संगीत ते कूसरीची । भले जाणती ते घडी अमृताची ।। ६६ ॥ असंभाव्य तो नत्यकल्लोळ जाला । सखे पाहतां शद्धि नाही जनांला ।। गुणी रातले मातले गायनाने । तदाकार ते वस्ति केली मनाने ।। ६७ ॥ अळंकार चीरे पुढे ढीग केले । कळावंत ते सर्व संतुष्ट जाले ॥ विसर्जी सभा तो पढे रामराजा । निरोपे चि गेल्या बहु लोकफौजा ॥ ६८ ॥ समस्ती घडी एक विश्रांति केली । अकस्मात प्राभात ते प्राप्त जाली ।। पुढे सारिते जाहले नित्य नेमें । महा वीर ते आपुलाल्या स्वधर्मे ॥६९ ॥ सभे बैसिजे स्वामि देवाधिदेवें । म्हणे आजि वेगीं अयोध्यसि जावे ।। पुरी सर्व शंगारमंडीत केली । असंभाव्य ते सर्व सेना निघाली ॥ ७० ॥ महीमंडळी मुख्य आधी पुराणी । मुख बोलिजे ते रवीवंशखाणी ।। अयोध्यापुरी धन्य हा पुण्यराशी । किती राहिले तापसी तीर्थवासी ।। ७१ ।। मुनी संत योगी सदा वीतरागी। उदासीन साधू पराचे विभागी॥ ऋषीमंडळी सात्विको सज्जनांची । महा योगि व्युत्पन्न विद्वज्जनांची ।। ७२ ।। कितीएक ते मंडळी प्रेमळांची । कितीएक ते ब्राह्मणां सूशिळांची॥ मनस्वी किती ते यती ब्रह्मचारी । बहतां परीचे बहू वेषधारी ।। ७३ ।। सदा सर्वदां योग ध्यानस्थ जाले । कितीएक ते काळ घेऊनि गेले ॥ भुयारें मच्या त्या बहुतां परीच्या । नदीचे तिरी पर्णशाला मठाच्या ॥ ७४ ॥ प्रभू देव हा सर्व ब्रह्मादिकांचा । जया वर्णितां शीणल्या वेदवाचा ।। स्वये यास जेथे जगन्नायकाचा । महीमा वदे कोण त्या हो स्थळाचा ।। ७५। कितीएक ते राहिले भक्त ज्ञानी । कृपाळ बहू मुख्य नामाभिधानी ।। बहू सूकृती सूर्य जैसे तपाचे । सदा धर्मचर्चा अखंडीत वाचे ।। ७६ ।। नदी चालिली भव्य ते पूर्णतोया । जनालागि आधार आली उपाया ।। शिवाल्ये बहू बांधिली थोरथोरे । ध्वजा देउळे शीखरे ती अपारे ।। ७७ ॥ १३. कळावंत फौजा-कळवांतणींचें ताफे.