पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (९१) वरी कंकणे मुद्रिका चापपाणी । ब्रिदे घातली अँदै वांकी झणाणी ।। महामंडळी सर्व ही एक जाले । रघुनायका भव्य लावण्य आले ।। ३३ ।। पहातां नसे तुळणा ही तुळाया। विराज बह भषणे दिव्य काया । ऋषीराज बंधू सखे आणि माता । सुखे पाहती राम हा सौख्यदाता ॥ ३४ ॥ प्रितीने मुखे बोलता राम जाला । म्हणे स्नान कीजे तया बांधवाला ॥ स्नेहे उत्तरे बोलतां शीघ तैसें । किजे मंगळस्नान नाना विलासें ॥ ३५ ॥ जटाजट ते मोकळे सर्व केले । मळे त्यागिले भव्य सुस्नात जाले ।। सगंधे उटी घेतली पुष्पमाळा | अलंकार दिव्यांबरे रत्नमाळा ।। ३६ ।। प्रसंगै समस्तांसि अभ्यंग जाले । सभोते सखे आप्त सर्वे मिळाले ।। अळंकार दिव्यांबरे दिव्य माता । सुखे राघवा पाहती त्या समस्ता ।। ३७ ।। फळे खाद्य नैवेद्य नाना परीचे । फळाहार ते आणिले कूसरीचे ॥ बहूतां परीचे बहू उंच मेवे । म्हणे राम सर्वांस ते पाठवावे ॥ ३८ ॥ समस्तांसि ऊदंड ते पाठवीले । फळें सेवितां लोक संतुष्ट जाले ॥ स्वइच्छा स्वये सेविले अल्प कांहीं । जनीं सेवितां तूळणा त्यांसि नाहीं ॥ ३९ ॥ जळे निर्मळे आच्मने शुद्ध केली | समस्तांसि पाने बहू पाठवीली ।। विडे घेतले सर्व ही स्वस्थ जाले । असंभाव्य ते पाक ही सिद्ध जाले ॥१०॥ पढ़ें मंडळी सेवकांची मिळाली । विशाळे स्थळे सर्व ही सिद्ध केली ।। बहू चित्रशाळा बहू होमशाळा । सडे शिंपिले घातल्या रंगमाळा ॥ ११ ॥ बडू रत्नमंडीत मोठी अचाटें । दुकांठी बहू मांडिली दिव्य ताटें ।। कितीएक ती बत्तिसां वाटियांची । कितीएक विस्तीर्ण नाना परींची ॥ ४२ ॥ असंभाव्य ती रम्य चित्र विचित्रे । बहुतां परीची बहू तोयपात्रे ।। बहू आसने दिव्य नाना परीची । असंभाव्य ती घातली कूसरीची ।। ४३ ।। बहुवर्ण दिव्यांबरे पट्टकळे । बहुरंग नाना परीची दुकूळे ।। असंभाव्य ती सोवळी सिद्ध केली । कितीएक दिव्यांबरे आणवीली ।। ४४ ।। पढ़े भोजना सर्व ही सिद्ध जाले । कितीएक ने लक्षकोटी मिळाले । मिळाली ऋषीमंडळी ब्राह्मणांची । बहू भव्य मार्तंड जैसे विरंची ।। १५ ।। बये धाकुटे थोर कोटयानकोटी। स्थळे रुधिली जाहली थोर दाटी ।। बहूसाल संतोषले थोर तोपें । असंभाव्य ते गर्जती नामघोषे ।। ४६ ।। बहूसाल गंधाक्षता पुष्पमाळा | बरी धोत्रपात्रे दिल्या रत्नमाळा ।। चिरे सुंदरे रम्य यज्ञोपवीतें । धनें चंदने दीधली ब्राह्मणांत ।। ४७ ।। ३३. अंदु-तोडे. ३१. मेवे-फळफळावळ. ३५. दुकुल वा.