पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत पुढे नन्ननी लागिं देवाधिदेवें । म्हणे मंगळस्नान तुम्ही करावे ।। १८ ।। समस्ती यथासांग अभ्यंग केले । पुन्हा देव तो भ्रातयालागि बोले ॥ सखे बोलती स्वामि देवाधिदेवा । तुम्ही सांग अभ्यंग आधी करावा ।। १९ ॥ बहूतां परी प्रार्थिले बांधवासी । कितीएक ते सिद्ध जाले विलासी ।। उभी मंडळी कुशळां नापितांची । तिहीं मांडिली सांग सेवा प्रभूची ।। २० ।। समश्रू कम नाहली त्या प्रसंगी । नखे काढिली नाळरंगी तरंगी ।। जटाजूट ते मोकळे केश केले । 'स्नेहे घालितां दिव्य चक्षु निवाले ।। २१ ॥ पुढे दर्पणी पाहिले रूप रामें । प्रसंगी तये कोटि कंपदधाम ।। कळा बाणली भव्य लावण्य गात्री । असंभाव्य सौंदर्य राजीच नेत्रों ।। २२ ।। नळे पादप्रक्षालना सिद्ध जाली । पदी लागतां स्वर्गगंगा निवाली ॥ पदांगुष्ठ भागीरथी ओघ आला । जने मज्जने लोक निर्दोष केला ।। २३ ।। पुढे तीर्य वंदूनि बंधूजनाने । निवाले पवित्रोदके तीर्थपाने ।। बहू लाविले लोचना आवडीने । मनी मानिले सौख्य या बांधवाने ।। २४ ।। बहूसाल आयुण्य हो कल्पकोडी । घडावी सदा सर्वदां भक्तिजोडी ॥ सुगंधे फुलेले चबाबीत माथां । महा मस्तकीं मर्दिती लोकनाथा ।। २५ ।। बहू मर्दना सांग नाना परीची। लिळे काढिली ते मळी निर्मळाची ।। नळे निर्मळे घालिती उष्ण धारा । मखें बोलती तोय आणीक सारा ।। २६ ॥ शिरी घालिती तोय नेटें घळाळां । नद्या वाहती उष्ण वाघे खळाळां ।। सुगंधे चि दोही तिरी पंक नाला | असंभाव्य तो भंग तेथे मिळाला ॥ २७ ॥ यथासांग अभ्यंग केले भुपाळे । पढें रम्य दिव्यांबरे शीघ्र काळे ।। महा तेज पुंजाळ ते लागवेगी । विरें वल्कले त्यागिली ते प्रसंगी ।। २८ ।। प्रसंगी तये रत्नमंडीत मानें । पुढें पादुका ठेविल्या बांधवाने ।। वसिष्ठासि रामें नमस्कार केला । महा वीर तो बैसला स्वस्थ जाला ।। २९ ॥ बहू कस्तुरी केशरे ते चि काळीं । ऋषी राम वीलेपवी गंध भाळी ।। बहू भूषणे रत्नमंडीत राम । अमूल्ये सखे घेतली पूर्णकामे ।। ३० ।। उटी घेतली घातल्या पुष्पमाळा । बहूतां परीच्या बहू रत्नमाळा ।। महा मस्तकी हेम मुगट साजे । असंभाव्य तो तेज-कल्लोळ माजे ।। ३१ ।। वरी कीरटी कुंडलें वैजयंती । अलंकार नाना परी ढाळ देती ।। चिरें सुंदरे घातला भव्य धौटा | कटी किंकिणी नागरा क्षुद्र घंटा ।। ३२ ॥ पा. २९. समथु स्मश्रु-हजामत. ३०. स्नेह-तेल. ३१. दर्पण-आर- सा. ३२.कंदपधाम मदमत्तेज. * वीतभर रुंद व पांच हात लांब असा जाळ्यासारखा वस्त्राचा पहा. हा कमरपट्यासारखा हनवटीखालून काम झाकत अशा रीतीने पागोटयावर बांधितात.