पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. सभामंडपी धर्मशाळा विशाळा । गृहे रम्य अतर्गहें चित्रशाळा ।। ३ ॥ बहूसाल दिव्यांबरे थोरथोरे । सुचित्रे विचित्रे अमोल्ये अपारे ।। कितीएक त्या लाविल्या स्तंभवोळी । प्रभा रत्नमंडीत तेजें झळाळी ॥ ४॥ बहू रत्नमाळा बहू मुक्तमाळा । बहू लागले घोस नक्षत्रमाळा ॥ कितीएक जाळीवरी अंतराळीं । कितीएक मुक्ते निराळी निराळी ॥ ५॥ सुद्धाळा किळा मंडपी ढाळ देती । विशाळा स्थळामाजि त्या दिव्य ज्योती ।। सुवर्णासने दिव्य नाना परीची । कितीएक सिंहासने कँसरीची ।। ६॥ बहू ते फुलारे बहूतां परीचे । वरी घोस हेलावती माणकांचे ॥ निळे पाच गोमेद इत्यादिकांचे । बहु रंग नाना परी कांचनाचे ।। ७ ॥ नभामाजि त्या दिव्य नक्षत्रमाळा । तयाचे परी शोभती मुक्तमाळा ॥ विराजे तया मंडपा मध्यभागी । ऋषी राम माता सखे बंधुवर्गी ॥८॥ असंभाव्य ते संपदा वैभवाची । मखें सर्व बोलावया शक्ति कैंची ।। चरी पाहतां उंच आकाशपंथे । असंभाव्य ते भव्य लावण्य तेथें ॥९॥ समूदाय तो बैसला स्वस्थ जाला । वधूमेळ अंतर्गृहामाजि गेला ॥ ऋषी राम माता सखे बंधुवर्गी | स्नेहे उत्तरे बोलिजे ते प्रसंगी ॥ १० ॥ कितीएक तो काळ गेला वियोगें । असंभाव्य ते सौख्य संयोगयोगें ।। सरेना मुखें बोलतां मोह माया । निवाली मुखे पाहतां सर्व काया ॥ ११ ॥ कपीनाथ बीभीषणाला भुपाळे । रहाया गहें दीधली ती विशाळें ॥ तयांमाज ते सर्व ही स्वस्थ जाले । समय बहू सोहळे दाखवीले ॥ १२ ॥ पुढे मंगलस्नान तेणें चि काळे । बहसाला ते चालिले एक वेळे ।। कितीएक ते हॉटकाचे तटाकी । जळे ठेविली सेवके ग्रामलोकी ।। १३ ।। असंभाव्य ती सिद्ध केली फुलेले । बहूतां परींची सुगंधेल तेलें ॥ किती चौकिया चौक गंगाळ पात्रे । विशाळे पवित्रं सुचित्रे विचित्रे ॥ १४ ।। सुगंधे रसे चोखण्या कालवील्या । यथासांग सामग्रिया सिद्ध केल्या ।। बहू आत पोर्टी उभा भर्त बंध । करी प्रार्थना राम कारुण्यसिंधू ।। १५॥ प्रभू बोलता जाहला शीघ्र काळे । किजे मंगळस्नान या लोकपाळे ।। अयोध्यापुरीमाजि त्या सर्व लोकां । विर सर्व संकेत केला अनेकां ॥ १६ ॥ समस्तांसि तात्काळ अभ्यंग जालें । महा लोक ते सर्व सूखें निवाले ॥ कितीएक सामग्रिया सिद्ध केल्या । कपीनाथ बीभीषणा पाठवील्या ॥ १७ ॥ पुन्हा राम बोले वरिष्ठां वरिष्ठां । किजे मंगळस्नान हो सर्व श्रेष्ठा ।। २३. अंतर्गहें जनानखाने. २. किळा=चुका, खिळे. २५. कुसरीची करामतीचों. २६. कपीनाथ–सुयीच. h बहूसाल-बहूदास २७. हाटक-सोने.