पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८८) श्रीरामदासकृत खणा दाविती एकमेकांस तेथे । मुखे बोलती राहिला राम येथें ।। महा वीर ते मुख्य धांवोनि गेले । कपीभार त्यांमाजि वेगी मिळाले ।। ९९ ॥ रघुनायकालागि शत्रुघनाने । नमस्कार केला तया मंत्रियानें ।। उभा वर्ग ते भेटले राघवाला । तया मानसी पोर आनंद जाला ।। १०० ॥ सुमित्रासुता आणि त्या जानकोला । महा वीर तीही नमस्कार केला ।। प्रसंगी समस्तां सिते भेटि जाली । सुखाची नदी अंतरामाजि आली ।। १०१ । सुमंतू समर्था म्हणे पैल पाहें । ऋषी नन्ननी मंडळी येत आहे ।।। तये सांगतां राम तो सिद्ध जाला । पदी चालतां तो पढे शीघ्र गेला ।। १०२ ॥ पुढे देखिला तो ऋषी ब्रह्मनिष्ठ । कुळा रक्षिता तो कुळामाजि श्रेष्ठ ।।। रघूनाथ तेये नमस्कार घाली । स्तुती उत्तरे आदरे भेटि नाली ।। १०३ ।। प्रसंगे नमस्कारिली मुख्य माता | बहू सौख्य जाले तयां भटि होतां ।।। समस्तां जीला नमस्कार केले । तया देखतां प्राण त्यांचे निवाळे ।। १०४ ।। समस्तांस तो भेटला राम जैसा । यथासांग तो वीर सौमित्र तैसा ।। नमस्कार घाली बहु स्तुति केली । तया देखतां मंडळी ते निवाली ।। १०५ ॥ सितासुंदरीने नमस्कार केले । असंभाव्य ते लोक तेथे मिळाले ।। स्तुती उत्तरे एकमेकांस जाली । प्रसंगी तये अंतरे ती निवाली ।। १०६ ॥ समस्तां समस्तां जणा भेटि जाली | पहाया सुखें लोकमांदी मिळाली ।। पुरीमाजि तो थोर आनंद जाला । मुखे बोलती हो सुखें राम आला ।। १०७ ।। सुखे पाहतां मुख्यमाता मिळाल्या । सर्वे सुंदरा त्या असंभाव्य आल्या ।। वधूची बहू दाटणी थोर जाली । सिता सुंदरी शीघ्र तेथे मिळाली ॥ १०८ ॥ नमस्कारिले नम्र होऊनि श्रेष्ठां । प्रसंगें चि भेटी वरिष्ठां वरिष्ठां ।। धडाडां नी वाजती चंड भेरी | बहू वारितां जाहली दाटि थोरी ।। १०९ ॥ महा वैभवाची कथा राघवाची । जनी सौख्यदाती च ब्रह्मांदिकांची ।। पुढे राम ऊपासके रामदासे | पुरी वर्णिली रम्य नाना विलासे ।। ११० ॥ बारावा प्रसंग प्रारंभ. पुढे चालिलो ते असंभाव्य सेना | रजे मातले व्योम पूढे दिसेना ॥ कितीएक ते भार सन्मख आले | समर्थास तीही नमस्कार केले ।। १ ॥ दळे राहिली दूरि वेष्टीत पाळा | कपीचक्र येकीकडे चंड मेळा ॥ तया मध्यभागी ऋषी बंधु माता । महा वीर ते मख्य चत्वारि कांता ।। २ ॥ उभा राहिला राम तो राजभारे | गहे निर्मिली अंबेरांची अपारे ।। २२. अंबरांची गृहें तंबू.