पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. पुढे रामभ्राता नमस्कार घाली । सुखाची असंभाव्य ते वेळ आली ।। तया देखतां सौख्य अद्भत जाले । वरी पाहतां वान सन्निद्ध आले ।। ८५ ॥ पुढे देखिला भव्य तो रामयोगो । असंभाव्य सेना तया पृष्ठभागी ।। त्वर चालतां धांवतो रामभ्राता । नव्हे धीर त्या भेटिचा काळ येतां ।। ८६ ।। बहू रम्य लावण्य कामावतारी । महा वीर दोघे रुपे योगधारी ।। तया देखतां रोम अंगों थरारी । सूखे पाहतां सर्व सेना थरारी ।। ८७ ।। रु सारिखे वीर दोघे मिळाले । सुखाचे बहू कंप रोमांच आले ।। पदी ठेविला मस्तक बांधवाने । तया ऊठवीले त्वरें राघवाने ।। ८८ ॥ स्पुरदूप आलिंगनी वीर गात्रीं । जळे लोट- रम्य राजीवनेत्री ।। तयां रामरामानुजां भटि जाली । प्रसंगी तये सृष्टि सूखे निवाली ।। ८९ ।। सुमित्रासुता भेटला वीतराँगी । नमस्कारिली मानकी ते प्रसंगी ।। खुणा दावितां रामराजाधिराजे । कपीनाथ ऑलिंगिला योगिराजे ।। ९० ॥ पुढे भेटिचा लाभ नैऋत्यनाथा | पदी ठेविला शीत्र येऊनि माथा ।। तयालागि रामानुजे ऊठविलें । समस्तां विरां राघवे भेटवीलें ॥ ९१ ॥ प्रिती भेटला अंगदा जांबवंतां । प्रसंगें कपी थोर थोरां समस्तां ।। स्तुतीउत्तरी बोलती एकमेकां ! स्नेहे लागला सौख्य जाले अनेकां ॥ ९२ ।। प्रितीने तया ग्रहका भक्तराजा । कृपाळपणे भेटला रामराजा ।। नमस्कार केला समस्तां विरांला । तयां अंतरी थोर आनंद जाला ।। ९३ ।। पुढे सर्व ही पुष्पकारूद जाले । दळेशी महा वीर तैसे निघाले ।। अयोध्यापुरी देखतां सौख्य जालें | प्रसंगें रघूनायर्के दाखवीले ॥ ९४ ॥ रुढींच्या मनासारिखे वर्ततोहे । महीमंडळी यान येऊनि राहे ॥ भुमी ऊतरे रामबंधू सितेशी । कपीनाथ सुग्रीव बीभीषणेशी ।। ९५॥ कपी रीस ते भार कोट्यानकोटी । दिसेना भुमी जाहली थोर दाटी ।। समर्थ विमानासि त्या पाठवीलें । कबरासि भेटावया शीव गेले ।। ९६ ॥ असंभाव्य तो वाद्यकल्लोळ जाला || कपी पाहती भार अद्भूत आला ।। रजे व्योम आच्छादिले सर्व कांहीं । विरां कंजरां घोडियां माति नाहीं ॥ ९७ ॥ कपी सर्व चाकोटले पाहताती ॥ गिरीचे परी भार अद्भूत येती ।। कपी भार ते देखिले राजभारें । पाहाया दळे लोटली ती अपारें ।। ९८ ॥ ११. कामावतारी इच्छामात्र करून अवतार घेणारा. १५ रोम-लोम केश-आंगावी- ल रोमांच (कांटा). १६. राजीवनेत्री कमळा सारख्या डोळ्यांत. १७. वीतरागी-भरत. १८. रुढाच्या बसणान्याच्या. १९. वर्तताहे-चालताहे. २०. मीति-गणती. २१. चाका- टले-चकीत झाले.