पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र. कांतासंग नसे प्रपंच हि नसे आशा दुराशा नसे ॥ ज्याला उत्तम रामदास म्हणती त्रैलोक्य वंदीतसे । ऐसा सद्गुरु हा अनंतकविचा बद्वास तारीतसे ॥ १ ॥ वस्त्रे हुर्मजि भर्जरी पट कुळे माथां चिरा ही असे । काया सुंदर गौर वर्ण विलसे भाळी अवाळू असे ।। स्वामींची कविता समुद्र अवघा कल्याण लीहीतसे | ऐसा सद्गुरु हा अनंतकविचा बद्धास तारीतसे ॥ २ ॥ ज्याची पूर्ण समाधि सज्जनगडी गुप्त प्रकारे असे । पादकांवरि शेष शोभत असे दोन्हीकडे आरसे || ज्याची पुण्यतिथी सुदीन नवमी उत्साह होतो असे । ऐसा सद्गुरु हा अनंतकावचा बद्धास तारीतसे ॥ ३ ॥ बेणे सात्विकराबसादि हि तिन्ही आत्मस्थिती आटले । ॐकारादि करूनि अष्ट देह वीदेहें निराकर्णिले ।। विज्ञानी भवसिंधुपार तरले जिंकोनि साही धरा । ऐसा सद्गुरु हा अनंतकविचा बद्धास तारीतसे ॥ ४ ॥ ज्याची गाढ उपासना जरि असे जाण अयोध्यापती । नेणे त्याहनि अन्य दैवत असे ऐशी जयाची स्थिती ॥ ज्याचा गुप्त विचार ही परि असे नारीनरां लेंकुरां । ऐसा सद्गुरु हा अनंतकविचा बद्धास तारीतसे ॥ ५ ॥ सह्याद्रीगिरिचा विभाग विलसे मंदारशंगापरी । नामें सज्जन जो नृपें वसविला उर्वाशियेचे। तिरी ।। आयोध्याधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरीं | तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥ ६ ॥ गांवीं कोणी गोविंद भट नांवाचा गहस्थ आपल्या कनिष्ट बंधुचे विधवे बरोबर रत झाला ते- णेकरून तीस गर्भ राहिला. ही वार्ता गांवांत कळतांच यामाधिकान्याने गोविंदभटास बोलावून विचारिलें. परंतु गोविंदभटाने त्या अधिका-यास कांहों लांच देम हे सत्य अनंत गोसाव्यावर घातले व त्यास धरून सुळावर देण्यास नेऊ लागले तेव्हा त्याने स्वा- मींचे चिंतन करतांच तेथे एक वानर उत्पन्न होऊन त्याने शिपायांस व अधिकान्यांस मार दिला. नंतर स्वामी प्रकट होऊन स्वामींनी सर्व वृत्तांत ऐकून घेतला व त्या बाईस विचारिलें की, तला गर्भ कोणाचा राहिला ? तेव्हां ती उगी राहिली व खालों पाहू लागली, तेव्हां स्वामी बोलले की, जर तू बोलत नाहीस तर आम्ही गर्भास विचारूं. नंतर गर्भास प्रश्न केला तेव्हा त्या गर्भाने खरा वृत्तांत कळविला त्यावरून अनंत गोसाव्याची सुटका झाली ष स्वामी तेथे अदृश्य होऊन टाकळीस गेले. कदाचित तो हा अनंत कवि असावा. +हिला उरमोडी नदी म्हणतात.