पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ महत्त्व देऊन आज्ञा दिली तर हे सर्व भूषण स्वामींचं आहे." असें भक्तिभावाचे प्रेमळ व कृतज्ञतादर्शक उद्गार काढिले आहेत. ह्यावरून वसईच्या राजकारणांत स्वामींच्या आशीर्वादाचा अतर्क्य प्रभाव मराठ्यांच्या यशप्राप्तीस किती कारण झाला, ह्याची चांगली कल्पना पेशव्यांच्याच पत्रांवरून वाचकांस सहज करितां येईल. स्वामींनी हे राजकारण सिद्धीस नेण्याकरितां कसकशीं सूत्रे फिरविलीं हैं सम- जण्यास मार्ग नाहीं; तथापि त्यांनीं त्यांत यश मिळविण्याचा पूर्ण संकल्प केला होता असे त्यांच्याच पत्रावरून दिसून येतें. लेखांक २९१ ह्या पत्रांत स्वामींनीं ह्या राजकारणास अनुलक्षून असे लिहिले आहे कीं, “वसई न आली तर या राज्यांत राहिल त्याचे संन्यासपण लटकें.” अर्थात् इतका दृढ संकल्प करून जी मसलत हातीं घेतली, तींत यशप्राप्ति खात्रीने व्हावी ह्यांत आश्चर्य ते काय ? तात्पर्य, स्वामींचे निश्चयाचें बळ व स्वजनकल्याणाची उत्कट इच्छा, आणि पेशव्यांची अपार भक्ति व तत्प्रेरित शौर्यशक्ति ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रराज्यसत्तेच्या अभ्युदयास कारणीभूत झालेल्या असून, त्यांचें मनन इतिहासशास्त्रवेच्यास अत्यंत आल्हाददायक होईल ह्यांत शंका नाहीं. राष्ट्रोन्न- तीची स्फूर्ति उत्पन्न करण्यास स्वधर्माभिमान कारण होतो. ह्याकरितां असे धर्मजागृति करणारे सत्पुरुष हेच राष्ट्राचे खरे कल्याणकर्ते होत असें ह्मणण्यास हरकत नाहीं. असे माहात्मे सर्व लोकांस वंदनपात्र व्हावेत व साक्षात् ईश्वराचे अवतार वाटावेत ह्यांत कांहीं नवल नाहीं. हे राष्ट्रांत निर्माण होणें हें केवळ परमेश्वरी कृपेचें फळ-ईश्वरी देणें-होय. श्रीसमर्थ रामदासस्वामी ह्यांनीं ह्मटलें आहेः- - धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । । झाले आहेत पुढे होणार देणें ईश्वराचें ॥ १ ॥ उत्तम गुणांचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ २ ॥