पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ भाग ६ वा. FO:-8 स्वामींच्या कांहीं विशेष गोष्टी. परमहंस ब्रम्हेंद्रस्वामी ह्यांचा उपलब्ध झालेला पत्रव्यवहार ह्या पुस्तकांत स्व- तंत्र रीतीनें दिला आहे. त्यावरून त्यांच्या राजकीय व सामाजिक उलाढालींची सर्व हकीकत कळण्यासारखी आहेच. तथापि, त्यांच्या स्वभावाचे व वर्तनक्रमाचें खरें स्वरूप कळण्याकरितां, त्यांच्या कांहीं विशेष गोष्टी सारांशरूपानें, अस्सल पत्रांच्या आधारानिशीं, ह्या भागांत सादर करावयाचें योजिले आहे. त्यांवरून स्वामींच्या खऱ्या जीवनचरित्राची रसिक वाचकांस थोडक्यांत चांगली कल्पना करितां येईल, व मयूरकवीनें म्हटल्याप्रमाणेंः- सत्पुरुषकथा अद्भुत रसदा ह्मणतो हिलाच सुरभी मी ॥ किंवा वामनपंडितांनी म्हटल्याप्रमाणे- , चरित्रें साधूंचीं अकपट विशुद्धेचि असती ॥ अशा प्रकारच्या साधुचरित्रांतील सौरस्य गुणाचा त्यांत पुष्कळ अंश दृष्टीस पडेल अशी आशा करण्यास हरकत नाहीं. स्वामींचा अत्युच्च मनोरथ. स्वामींच्या हृदयांत स्वधर्म व स्वराज्य ह्यांची अभिवृद्धि होऊन स्वजनक- ल्याण व्हावें, हा अत्यंत पवित्र हेतु पूर्णपणे वसत होता. लौकिकजनास त्यांच्या स्वभावाचे बहुविध आविर्भाव दिसत होते; परंतु त्या सर्वांचा उगम ह्या उन्नत हेतूपासून होता, हें खचित आहे. कोठें हृष्ट, कोठें रुष्ट, कोटें प्रेमळ, कोटें कटोर, कोटें नम्र, कोटें उम्र असे त्यांच्या वर्तनाचे नाना प्रकार दृष्टीस पडतात. परंतु त्या सर्वोचं पर्यवसान लोककल्याणावांचून दुसरे कोणतेंही नाहीं. पेशव्यांच्या कित्येक पत्रांत त्यांच्या ह्या अत्युच्च मनोरथाचें खरें स्वरूप व्यक्त झालेले आहे. ते त्यांच्याच शब्दांनी येथे सादर करितों :- - लेखांक २७५ मध्यें स्वामीमहाराज पेशव्यांस लिहितातः- “लक्षकोटी रत्ने माणकें मजला दिलीयानें कांहीं माझी कीर्ति वाढत नाहीं. उभयतां दोनी