पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" एवढेच नव्हे तर ह्या महापुरुषाच्या कृपासाहाय्यामुळेच हा विकट मनसवा पार पडला असें प्रांजलपणे कबूल करणे भाग पडते. लेखांक ११९ ह्या पत्रामध्यें बाजीरावांनी लिहिले आहे:- “स्वामींचा कोप फिरंगी यावरी जाहला अ- सतां त्याचें बरें होईल हें सर्वथा घडणारे नाहीं. आपण साक्षात् ईश्वर - अवतार. जें चित्तांत स्वामींच्या येते व मुर्खकरून वक्तृत्व होतें, ते घडून येतेच येतं. वसई हस्तगत होईल ह्मणून स्वामीं बोलिले आहेत. तद्नुरूप वसई हस्तगत होईल ह्यांत संदेह नाहीं. व आह्मांस सर्व भरंवसा स्वामींचे आशीर्वादाचा. त्यास, आशीर्वाद आमचे मस्तकीं व कृपाही विशेष तेणेकरून जें करूं तें सिद्धीस पावेल." लेखांक ५१ ह्या पत्रांत चिमाजी आपा लिहितातः- “स्वामींनीं कृपा करून अभयउत्तरं देऊन वसई दिली ह्मणून आज्ञा केली, तेव्हां वसई दिलीच. स्वामींचें अभय पूर्ण चित्तांत धरून आज्ञेप्रमाणे शरीरद्वारां साहस करणें तें आह्मी सर्वही करीत असों तरी वसईवर स्वामींचा ध्वजारोहण करण्यास स्वामी समर्थ आहेत.” पुनः लेखांक ५२ ह्या पत्रांत, “वसई स्वामींचे आशी- वीदें फत्ते झाली. श्रीचे सुदर्शन धर्मद्वेष्टे यांचे मस्तकीं वज्रप्रहार होऊन टो- पीकर म्लानत्व पावले. अन्यथा वसई सही न होती. फिरंगी आगीचा पुतळा होता. स्वामींचे कर्तृत्वास पार नाहीं! स्वामींचा महिमा स्वामी जाणत " असें लिहून, लेखांक ५४ ह्यामध्यें, “वसई फत्ते जाहली यावरून स्वामींनी मजला कित्येक कृपाउत्तरं गौरवून, दाशरथी आदिकरून साक्ष-उपसाक्ष देऊन आज्ञा दिली; तर सर्व सामर्थ्य स्वामींचे आशीर्वादाचे वसई दिल्ही, दिल्ही, ह्रीं उत्तरें त्रिवार स्वामींनी लेख केली, व स्वामींनी पाटसास मज दर्शन दिलें, तेथेंही वसईविशीं अभय दिले. तदनुरूप स्वामींनी वसईवर सुदर्शन प्रेरून धर्मद्वेष्टे यांचा निःपात केला. येरवीं वसई सई होती असें [नवतें ] व टोपीकर अभिरूप होते. यांच्या सर्व शक्ति कुंठित करणे हा प्रताप स्वामींचा. आम्हां मानवी लोकांचें हे कृत्य नव्हे. श्री रघुनाथ [ यांणीं] वानरांहस्ते समुद्री पाषाण तरवून, लंकेशादि त्रिकुटाचळाचे मर्दन केलें, तैसेंच श्रीकृष्ण यादवांहस्तें ग्लेंच्छादि दैत्यांचें निर्दळण केले, त्याचप्रकारें पाश्चात्यांचें उपमर्दन स्वामींनी क रून वसईत ध्वजारोहण केले. स्वामी मूर्तिमंत ईश्वररूप आहेत. प्रताप कर्तृत्व वर्णावयास आमची बुद्धि नाहीं प्रापंचिक विचारें स्वामींनी मज " , स्वामींचा .