पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ राहतील त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे राहूं दिले जाईल, आणि त्यांच्या तीन प्रार्थनामंदिरांचें (Churches ) संरक्षण केले जाईल, अशी दोन कलमें होती. तीही चिमाजी आपांनी उत्तम रीतीनें पाळली.' येणेप्रमाणे मराठ्यांस अद्वितीय यश प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी फिरंगी लो- कांच्या जुलुमामुळे परागंदा झालेल्या सर्व लोकांस अभय देऊन, त्यांच्याकडून साष्टी प्रांतांत वसाहत करिविली गंगाजी नाईक वगैरे अणजूरकर मंडळींस व अंताजी रघुनाथ वगैरे ब्राह्मण मंडळींस त्यांची पूर्वीची वतनें व वृत्या इनाम करून दिल्या. सारांश, वसईप्रांतामध्ये स्वराज्य झाल्यामुळे स्वधर्मस्थापना होऊन पूर्ववत् प्रमाणे “देवधर्मादिक" चालू लागले. तेणेकरून सर्व प्रजा संतोष पावली. अशा रीतीनें धर्मरक्षणार्थ हाती घेतलेल्या ह्या वसईप्रकरणाचा गोड शेवट झाला. वर सांगितलेले वसईचं राजकारण सिद्धीस नेऊन स्वधर्मप्रतिपालनाचें काम चिमाजी आपांनी उत्तम रीतीनें तडीस नेलें; परंतु त्याचें पुष्कळ श्रेय ब्रकेंद्र- स्वामीसच दिले पाहिजे. ह्या राजकारणामध्यें स्वामींचं प्रधानांग असून त्यांनी आपल्या प्रोत्साहक व निग्रही वाणीनें चिमाजी आपा व इतर मराठे सरदार यांस विलक्षण उत्तेजन दिले. त्यामुळे त्यांची भक्तिपूर्ण हृदयें वीररसानें उचंबळून जाऊन त्यांच्या हातून हे महत्कार्य घडून आले, असे झटलें असतां तें अप्रयो- जक होणार नाहीं. ह्या मोहिमेसंबंधाची एकंदर चौदा पत्र उपलब्ध झाली आहेत. त्या सर्वावरून तीत प्रथमपासून स्वामींचा अनुग्रह, त्यांचा आशीर्वाद, आणि त्यांचा सदुपदेश प्रधानत्वेंकरून प्रवर्तत होता, असे स्पष्टपणे दिसून येतें. १ मराठी बखरीमध्येच ह्याबद्दल चिमाजी आपांची स्तुति केलेली नसून इंग्रज इतिहासकारांचाही त्यास स्पष्ट पुरावा आहे. डानव्हर्स साहेब लिहितात:- "On the departure of the Portuguese from Bassein, the Mah- •rattas took possession of that place, and testiinony is borne to the fact that they faithfully observed all the conditions of the capitulations, permitting all who wished to remain in peace." Page 412. २ लेखांक ३७, ३९, ४०, ४७, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५८, ११९, १२०, २९१ पहा.