पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ दाक्रांत करून वसईवर आपला स्वधर्मसंरक्षणाचा बाणा दाखविणारा भगवा झंडा फडकविण्यास समर्थ झाले; तो वीररसाने ओतप्रोत भरलेला वृत्तांत ऐकून ज्याचें अंतःकरण आनंदानें व कौतुकानें थक्क होणार नाहीं असा मनुष्य विरळा. ह्या सर्व रणसंगराचें साद्यंत वृत्त मराठ्यांचे वीरशिरोमणी चिमाजी आपा ह्यांनीं स्वतःच वर्णिलं आहे. तें लेखांक ५३ ह्यामध्ये सादर केले आहे. त्यापेक्षां अधिक सत्य, सविस्तर व सरस वृत्तांत कोठेंही मिळणे अशक्य असल्यामुळे तोच वाचण्याची तारीफ करण्यावांचून दुसरा मार्ग नाहीं. हा वृत्तांत वाचला ह्मणजे मराठ्यांचे अभिनंदनीय शौर्य व पोर्तुगीज लोकांचं वर्णनीय रणकौशल्य श्यांचें मूर्तिमंत चित्र नेत्रापुढे उभे राहतें. चिमाजी आपांनी आपल्या पत्रांत “फिरंगी यांणीं मर्दुमी शिपाईगिरी ह्मणावी तशी केली" असे आनंदभरानें उद्गार काढून पोर्तुगीज लोकांच्या शौर्याची फार प्रशंसा केली आहे; व अरिच्याहि सद्गुणांतें प्रेमें वाखाणितात सुज्ञानी ॥ ह्या मयूरकवीच्या सदुक्तीप्रमाणे आपले सौजन्य व चित्तौदार्य पूर्णपणे प्रकट केलें आहे. त्याचप्रमाणें इंग्रज व पोर्तुगीज लोकांनींही मराठ्यांच्या शक्तिप्र- भावाचें, युद्धनैपुण्याचे आणि धैर्यातिशयाचें योग्य अभिनंदन करून आपली रसिकता व्यक्त केली आहे. 2 वसईच्या युद्धांत पोर्तुगीज लोकांचा प्रमुख सेनापति सिल्व्हेरा डि मेनेझेस हा मृत्यु पावला, व त्यांचे ८०० लोक पतन पावले. तेव्हां त्यांचा दुय्यम सेनापति डिसोझा पेरिरा ह्यानें चिमाजी आपांस शरण जाऊन तहाचं बोलणें लाविलें. चिमाजी आपांनी ता० १६ मे ३० स० १७३९ रोजी त्याच्या सर्व अटी कबूल करून फिरंगी लोकांस शस्त्रांनिशीं व त्यांच्या मालमिळकतीनिशीं सुरक्षित- पणें वसईपार जाऊं दिलें. ह्या तहाच्या कलमांमध्यें, जे ख्रिस्ती लोक वसईत १ ग्रांटडफ साहेबांनी “This remarkable siege, the most vigor- ous ever prosecuted by Mahrattas " असे उद्गार काढिले आहेत. मि० अंडरसन ह्यांनी "The siege was carried on with such extra- ordinary vigour, skill, and perseverance, as perhaps Mahrattas have in no other instance displayed. " असे मत दिले आहे. असेच इतर ठिकाणींही तत्संबंधाचे अनेक स्तुतिपर उद्गार दृष्टीस पडतात.