पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ यमसदनीं पाटविलं. पेड्रो डि मेलो हा मृत्यु पावतांच फिरंगी सैन्याची अ- गदीं दाणादाण झाली व त्याने वसईकडे पळ काढिला. नंतर मार्टिनो डा सिल्वेरा डि मेनेझेस (Martino da Silveira de Menezes ) ह्यानें मुख्य सेनापतीचीं वखें घेतलीं व तो मराठ्यांशी युद्ध करण्यास सिद्ध झाला. , पेड्रो डि मेलो मृत्यु पावल्यानंतर चिमाजी आपांस विशेष स्फुरण चढले. त्यांनी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजी भिवराव, रामचंद्र हरी, य- शवंतराव पवार, विठ्ठल शिवदेव वगैरे निवडक सरदार बरोबर घेऊन सैन्याची उत्कृष्ट व्यवस्था केली; आणि माहिम केवें, तारापूर, शिरगांव, डाहाणू, नारगोळ, खतळवाड वगैरे शत्रूकडील जागा ओळीनें फत्ते करण्यास सुरुवात केली. तारापूर येथे चिमाजी आपांचें व फिरंगी लोकांचें फार निकराचे युद्ध झाले. त्याचं साद्यंत वर्णन खुद्द चिमाजी आपांनीं बाजीरावांस लिहिले आहे. (लेखांक ४९ पहा). ते वाचले असतां मराठ्यांच्या मर्दुमकीचें मूर्ति- मंत चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. असो. येणेप्रमाणे फिरंगी ह्याचा चोहों- कडून पराभव करून चिमाजी आपांनीं वसईखेरीज सर्व जागा पादाक्रांत केल्या. नंतर वसईवर लगट करून तीही घेण्याचा संकल्प केला. - मराठ्यांच्या इतिहासामध्यें, अतुल पराक्रम, अचाट साहस, अलौकिक तेज, अद्वितीय रणोत्साह आणि अपार स्वाभिमान हे गुण व्यक्त करणारे जे कांहीं युद्धप्रसंग प्रसिद्ध आहेत, त्यांमध्यें वसईचा रणसंग्राम हा अग्रस्थानीं गणण्यासा- रखा आहे ह्यांत शंका नाहीं. फिरंगी लोकांनीं हिंदुधर्माचा व हिंदुप्रजेचा व अत्यंत छल केला, ह्मणून संतप्त झालेले निस्सीम स्वधर्माभिमानी महाराष्ट्रवीर एकत्र होऊन दृढ निश्रयाने शत्रूस जिंकण्याकरितां वसईवर चढाई करून गेले; व तेथे मोठ्या आवेशान तीन महिनेपर्यंत सतत अभिगोलांचा भयंकर वर्षाव होत असतांही वेढा देऊन बसले; आणि अखेर आपल्या बाहुबलाने शत्रूस पा १ क्याप्टन ग्रांटडफसाहेब ह्यांनी ह्या ठाण्याच्या लढाईत पोर्तुगीज सेनापति Don Antonio Frois हा योद्धा शौर्यानें लहून समरांगणामध्ये पतन पावला असे लिहिले आहे. परंतु ही चूक असावी. ह्या वेळीं Pedro de Mello हा सेनापति होता व तो मारला गेला.