पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ प्रांतींचें वर्तमान स्वामींस कळेल. स्वामींचा उपराळा या प्रांतीं वरचेवर होईल. व दमणप्रांती आजपर्यंत आमची स्वारी गेली नाहीं. याजकरितां त्या प्रांतीं स्वारी पाठवून, मुलूख मारून, ताराज करून, गुरुढोरें कुळेंडाळे धरून आणावीं. तेणेंक- रून शह बसोन गनीमाचा ओढा तिकडे पडेल. इतक्या गोष्टी स्वामींचें येणें नासिकप्रांतीं जाहलियास होतील. तर अगत्य स्वामींनीं नासिकप्रांतीं आले पाहिजे. आह्मांजवळ सामान गनीमापुरते आहेच. तथापि लोकांत अवसान राहिलें नाहीं; आणि जबरदस्तीनें शत्रूचें तोंड फोडल्याविना गनीमावर इभ्रत वसोन आपले माणसास तेज चढत नाहीं. यास्तव, फौज भारीच या प्रांती पाठवावी. मुलकाचा सत्यानाश दमणप्रांती करावा. तारापुरचे आश्रयास माहिम मनोर वगैरा प्र याचे कित्येक गांव गेले आहेत. जुजबी रयेत आस- पास मात्र आहे. तिचे संरक्षण करून वरकड दमणप्रांत वगैरा मारून ताराज करावा. एखादे जागा गनीम गांठून कापून काढावा ह्मणजे आपली सलावत वाढेल. विदित जाहले पाहिजे. हे विज्ञापना.” " ● रामचंद्र हरीची व फिरंग्याची ही लढाई चालली असतांना चिमाजी आपा व बाजीराव निजामार्शी युद्ध करण्याकरितां खानदेशांतून उत्तरेकडे जात होते. त्यांस हैं वासुदेव जोशांचें पत्र पावतांच, त्यांनीं मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे ह्यांचे हाताखालीं सैन्य देऊन त्यांस त्यांच्या मदतीस पाठविले. पोर्तुगीज सेनापति पेड्रो डि मेलो ह्याने मराठ्यांकडून साटी, व ठाणे ह्या जागा परत घेण्याचा पक्का निश्चय केला, व आपल्या सैन्याची कडेकोट तयारी चालविली. लिस्वन येथून त्याच्या मदतीकरितां दोन लढाऊ जहाजें आलीं; व गोंव्याच्या गव्हरनराकडूनही काही निवडक लोक व दारुगोळा येऊन पोहों- चला. तेव्हां त्याने ठाण्यावर हल्ला करून ती जागा पहिल्याने सर करण्याक रितां, तिकडे ता० ४ दिसेंबर रोजीं, आठ गलबते व तीस फत्तेमान्य ह्यांसह कूच केलें. ता० ६ रोजी ठाण्यास पोहोंचतांच त्याने प्रथम पाणबुरजावर मार केला. गरनाळीचे गोळे बुरजावर टाकिले. दोन दिवसपर्यंत गोळ्यांची एकसारखी वृष्टि केली. ह्या समयीं मल्हारजी होळकर प्रभृति मराठे वीरांनीं मोठ्या शौर्यानें त्याचा मारा सहन करून त्याशी लगट केला, व त्याचा पराभव करून त्यास , ६