पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० ● याजनिमित्त आह्मी येथे खबरदार राहिलों आहों. गनीम हांवभरू जाइला आहे. याजकरितां येथील मदतीस एका दो दिवसांत येईल असा दिसतो. आलाच तर गनीमास ठेचगा देतों. आह्मांजवळ सामान ह्मणावें तरी दोनी फौजा मिळोन साडेतीन हजार माणूस सात आठशें पर्यंत राऊत आहेत. आ- जपर्यंत दोन तीनशें माणूस पळाले. दोन अडीचशे माणूस कामास आले. लोकांस रोजमुरा अद्याप पावला नाहीं. दोन महिने चढले. ऐशा चारी गोष्टी या प्रसंगी जाहाल्या. याजमुळे लोकांनीं घर सोडिला आहे. ऐसें असोन लोकांचे समाधान करून, अवध्यास दिलदिलासा देऊन येथील मोर्चे काईम करोन, एकवेळ गनीमास बरासा नतीजा द्यावा हे उमेद धरोन राहिलो आहों. स्वामींचे पुण्येंकरून जें होणें तं होईल. राजश्री शंकराजी केशव यांस लेहून जंजिरे अर्नाळा व बहादुरपुरा येथील खबरदारी करणें. तेप्रमाणे रा० खंडोजी माणकर यांस लिहोन धारावी व ठाणे, व रा० दत्ताजी मोरेश्वर यांस लेहून आशेरीचे मोर्च्याची खबरदारी व रा० नारायण जोशी यास लेहून किल्ले बेला- पुर, व रा० बरवाजी ताकपीर यास लेहून कल्याण भिवडी येथील खबरदारी करावीशी आहे. परंतु गनीमानें आपले जागियाची मजबुदी करून दोन हजार स्वारीस निघाला आहे. आरमाराचा गनीम हांवभरू जाहला आहे. याजमुळे आपले लोकांनी जागचेजागा दहशत खादली आहे. स्वामींचा उपराळा जाहलियाविना लोकांस अवसान चढोन गनीमास नतीजा पोहचत नाहीं. आणि आजपर्यंत केलें कर्म व्यर्थ होतें. तरी स्वामींनीं सहस्र कामें टाकून, जरूर जाणोन, राऊत व हशम पाठवून तेथील स्थलांचा उपराळा होय ते गोष्ट केली पाहिजे. बहादरपुरा येथील मो र्च्यावर एकवेळ गनीम तोंड देईल. याजकरितां तेथील उपराळियास दोन चारशें राऊत व एक मातबर सरदार अथवा राजश्री दुर्जनसिंग पाठवून ते- थील उपराळा अति त्वरेनें केला पाहिजे. राजश्री शंकराजीपंताकडे येथूनही राऊत शंभर पाठवितों. राजश्री रायाकडील वर्तमान आपणास आलेच असेल. तरी स्वामींनीं खानदेशांत न राहावें. नासिकप्रांत यावें. ऐसा विचार जा हला असिला तरी स्वामींनीं अविलंबें नासिकप्रांतें आले पाहिजे. तेथें आलि यास तिकडील शह चुकतो ऐसें नाहीं. आणि इकडील उपराळा होईल. या त्यास