पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• आला. त्याणें हुके व हात गरनाळा व बरखंदाजीचा मार बहुत जबरदस्त केला. तेणेकरून मोर्चे जळण्यास लागले. लोकांनी बाहेर निघोन हत्यार करावें तरी गनीम भारी. याजकरितां मोर्चे बुर्जासारिखे घातले होते. त्यास कवाड एक होते. तें सलावत कुचे चर खटला होता त्यांतून जावें यावे असं होतें. तोंड गनीमानें धरिलें. लोकांस बाहेर निघोन हत्यार करावयास जागा नाहीं. ऐसे जाहलें. तेव्हां मोर्च्याचा उपराळा करावा ह्मणून रा० रामचंद्रपंत व अमर- सिंग शिर्के वगैरे दहा पंधरा राउतांनीं घोडी घातली. त्यांणीं गनीमाकडील दहा पंधरा माणूस मारिले. रा० रामचंद्रपंतांनीं खुद्द दोघे ठार केले. आणि गनीम फिरविला. ते प्रसंगी रा० रामचंद्रपंतांस उजव्या हातावर स्तनाचे वरती चार बोटें पट्ट्याखालीं गोळी लागोन मोहरा चुकोन पार होऊन गेली. हातीं तरवार होती तिचा झटका बसोन हाड नादावले आहे. हातची तरवार झटका बसोन गळोन पडली. तेणेंकरून पायांच्या गुडध्यास लागली आहे. ऐसें होतांच मशारनिल्हे फिरले. याउपरांत गनीमानें सोखी करून मोर्चे का बीज केले. आमचे लोकांचा धर सुटोन निघाले. राजश्री माहादाजी केशव व वाघोजीराव खानविलकर (?) व राजवाराव बुरोडकर व चिंतो शिवदेव व जनार्दन हरी व गणेश हरी कारकून दिं। माहादाजी केशव व धोंडोपंत विउल शिवदेव याचा भाचेजावई, वगैरे लोक ऐसे मोर्च्यात होते. त्यांस निघावयास फुरसत न जाहली. तेथेंच झुंजोन कामास आले. व राघोजीराव खानविलकर याजकडील भाऊबंद देखील आपण एकेच जागां कामास आले. आणखी लोक कामास आले. त्यांची अद्यापि गणती सांपडली नाहीं. अज- मासें दोनों माणूस कामास आले व जखमी शंभरांपर्यंत आहेत. लोक मोर्चे सोडून बाहेर निघाले. गनीम फार. रा० माहादाजी केशव कामास आले. रा० रामचंद्रपंतांस जखम लागली. लोकांनीं घर सोडिला. याजकरितां पालखी पाठऊन रा० रामचंद्रपंत व अवधी फौज येथें आणिली. अवध्यांचा शोध घेऊन हजीरी मनास आणून सविस्तर मागाहून लेहून पाठऊं. होणार गोष्ट ती जाहली त्यास उपाय नाहीं. आह्मीं शिरगांवची व माहीमची (अशा) दोन फौजा एकत्र करून येथील मोर्चे काबीज केले आहेत. गनीम हांवभरू जाहला आहे. आह्मीं येथून घर सोडिला तरी अवघेच जागा घर सुटेल.