पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ करण्याचा निश्चय केला. रामचंद्र हरीची व पोर्तुगीज सेनापति पेड्रो डी मेलो ह्याच्या सैन्याची माहीम येथें जी चकमक उडाली, तिचा वीररसात्मक वृत्तांत कल्याणचे सुभेदार वासुदेव जोशी व रघुनाथ हरी ह्यांनी ता० २४ नोव्हेंबर ३० स० १७३७ रोजी लिहिलेल्या एका पत्रांत इत्थंभूत वर्णिला आहे. तो सुदैवेंकरून उपलब्ध झाल्यामुळे तोच अस्सल बरहुकूम येथे सादर करितों. “श्रीमंत आपा स्वामींचे सेवेसीः- - - , पोप्य वासुदेव जोशी व रघुनाथ हरी कृ० सा० नमस्कार अनुक्रमें दंडवत विनंति उपरी येथील कुशल ता॥ छ १२ रमजान जाणोन स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. विशेषः रा० रा० रामचंद्र हरि व माहादाजी केशव यांणीं माहिमास मोर्चे लाविले होते. त्याज (?) होऊन पुढे सलाबत कुचे चर खणून मोर्चे कोटाखाली भिडविले होते. हे सविस्तर पूर्वी लिहिले आहे. त्याज- वरून विदित जाहलेच असेल. गनीम इंग्रज फिरंगी व हबशी ऐसे एकत्र होऊन, दोन तीन दिवसां शंभर गलबतें भरून, मदत माहीम केळवे येथील कोटामध्ये गेले. गनीम भारी जाहला, याजकरितां येथून राउताचा व लो- कांचा उपराळा करावयाचा तो करीतच होतों. माहिमास मोर्चे उत्तरेकडे लागले होते. दक्षिणेकडे केळवे आहे तें आंग मोकळे होतें. तिकडे रोज- बरोज गनीम चार पांचर्स माणूसपर्यंत बाहेर पडत असे. त्याजवर मोर्चा- वरून लोक व राऊत धाऊन जात. त्यांची यांची झीटपीट होतांच गनीम कोटामध्ये जाय. आपले लोक फिरोन येत. त्याजउपर छ ९ रमजानी एकाद- शीस केळवियाकडील तर्फेस सात आठसें माणूस निघाले. त्याजवर रा० राम- चंद्रपंत राऊतांचे जमावानिशीं चालोन गेले. गनीमाकडील पंचवीस तीस माणूस मारिले. याजकडील एक राऊत पडिला एक दोन घोडीं जखमी जाहलीं गनीम आश्रियास गेला. राऊत फिरोन मोर्च्यावर आले. इतकें वर्तमान ते दिवसीं जाहलें. त्याजउपरी काल छ ११ रमजानीं दोन प्रहरा जाहलें. मोर्च्यावरील कांहीं लोक जेवण्यास गेले होते आणि मोर्चे कोटानजीक भिडले होते. गनीमानें संधी पाहून दीड हजार दोन हजार माणूस निघोन मोर्च्यावर चालून घेतले. एकेच वेळेस तीहीं मोर्च्यावर हल्ला केला. खबरदार होऊन बरेसे झुंजले. परंतु गनीम भारी. कोटावरून तोफांचा मार जबरदस्त केला. मोर्च्यावर गनीम ·