पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैका खाऊन नाचीज होतो! असो. तुह्मांस रवाना केलें तें सांगून रवाना केलें. पायेचा जमाव साहारों माणूस व कल्याणचे आरव एकशें चौपन्न व धोंडो व्यंकाजी याजबराबरील एक हजार व वाघोजीराव खानविलकर व पदाजी करके मिळून पांचशे व शंकराजी केशव याजकडील जुन्या भरण्या- पैकीं एक हजार एकूण साडेबत्तीसशे माणूस केळवे माहीमच्या कार्यभागास तुझांकडे नेमिले आहे. सरदारही तुमचेच ताबीन आहेत. राजश्री महादाजी केशव यांनी शंकराजीपंताजवळ जावे. वरकड सरदारांनीं तुमचे आज्ञेप्रमाणे वर्तावें. ऐसें कित्येक राजश्री शंकराजी केशव यांस फजीत करून लिहिले आहे. तरी तुझीं सदरहू साडेबत्तीसशे माणसांनिशीं केळवें माहीमास लगट करून दोन्ही स्थलें हस्तगत करणे. मराठे, कानडे, परदेशी लोक आहेत. त्यास झुंझ भांडणाचे प्रसंगी कित्येक माणूस सलावत खाऊन पळून जातात याजमुळे कैद सलावत होते. ऐसीयास लाखोलाख रुपये खर्च करून लोकांस द्यावे, आणि प्रसंगी पळ काढितील त्या पाजींचा मुलाहिजा काय ? जे दालीची शरम धरून साहेबकाम करितील त्यांचें ऊर्जित करीतच आहों. पळून जातील त्यांचा मुलाहिजा काय निमित्य करावा ? ज्या ज्या वाटा पळून जावयाच्या आहेत तेथें चौक्या ठेऊन, पळतील त्यांस धरून परिच्छिन्न डोचकीं मारणे. सरदार अगर प्यादा न ह्मणणे विना एकाददुसरा सरदार अगर परदेशी कानडे मारल्याविना माणूस भय धरून वर्तणार नाहीं. यास्तव हेंच पर- वानगी जाणून पळ्याचे पारपत्य करणें. रामचंद्रपंतास लाख रुपये खर्च होतात. या गोष्टीची कळकळ आणि इरे सर्वांहीं धरिली तरीच खावंदाचें काम होऊन सलावत चढेल. नाहींतरी पैका खर्चला तितका व्यर्थ आहे ! असो. तुझांस विस्तार लिहावा सारिखा नाहीं. येथील मर्जी तुझांस ठावकी आहे. तेथीलही प्रसंग पाहिलाच असेल. जातीनसीं व जमेतीनसीं रात्रंदिवस कस्त करून केळवे माहीम हीं दोन्हीं स्थळे हस्तगत करणें. फिरंगी याच्या लोकांनीं वारें घेतले आहे. तुह्मांवरही तोंड टाकितील. त्यांस जपून एकवेळ कापून काढणे. ह्मणजे तेही बलखुद राहतील. जाणीजे छ० २६ रजब " ह्या वीर्योत्साहक पत्रानें रामचंद्र हरीसारख्या बाणेदार वीरास तेव्हांच स्फु रण चढलें; व त्यानें ताबडतोब माहिमास मोर्चे लावून फिरंग्यास पादाक्रांत