पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ ह्या वेळीं बाजीराव पेशव्यांनीं रामचंद्र हरीस एक फार जोरदार पत्र लिहिलें आहे. त्यांत जे कोणी मराठ्यांचे सरदार इमानानें चाकरी करणार नाहींत व पळून जातील, त्यांना पकडून आणून त्यांची डोचक मारावीं असें साफ फर्माविले आहे. ह्यापत्रावरून बाजीराव पेशवे कसे इरेस पेटले होते हैं चांगले दिसून येतं. हें पत्र येणेप्रमाणेः– - “अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री रामचंद्र हरी गोसावी यांसीः— सेवक बाजीराव बडाळ प्रधान नमस्कार. सु॥ समान सलासीन मया व अलफ. फिरंगी यांचें आरमार खांदेरीच्या बाऱ्यावरीं आलें. हे खबर अ णजूरकर यांनी राजश्री शंकराजी केशव यांस लिहिली. त्यावरून त्यांनी सला- बत खाऊन केळवें माहीम येथील लोक उठवून माघारे नेले. गनीमाची सलाबत वाढविली. ऐशियास वसई, अरनाळा आदिकरून लोकांचें सामान जसे तसे नाहीं. नामांकित माणूस किती आणि गनीमाची सलाबत खातात ! यावरून त्यांचे व त्यांजवळील लोकांचे मर्दुमीच्या तारीफा काय कराव्या ? असो. न व्हावें तें झालें ! अतःपर गनीमावरी सलावत चढवून केळवें माहीम हीं स्थळे जबरदस्तीनें घेतलीं, तरीच त्या लोकांची व सरदारांची शाबास नाहीं तरी यथास्थित असे. विशेष रा० अंताजी रघुनाथ यांहीं पूर्वीपासून सेवा चाकरी केली. फिरंगाणच्या मनसुब्यामुळे हैरान पेरोशान जाहले. ठाणे घ्यावें ह्मणून सेवकास रवाना केलें. तेव्हां अंताजी रघुनाथ व अणजूरकर व उलेकर बरोबर दिले. त्यांत तिघांनीं आंव ह्मणावा तैसा धरिला सेवकानें तिघांस हातीं धरून, यद्यपि एकाचे हातून कार्य जाहले तर एकाचे हातून कार्यसिद्धता करावी. याचप्रमाणे तिघांनीं आंव धरून कार्यसिद्धता स्वामींचे पुण्यप्रतापेंकरून जाहली. त्यास अंताजीपंताची वाजवी गोष्ट कोणी न ऐकत. यास्तव आपले जागीं श्रमी होऊन घरी बसले आहेत. सांप्रत स्वामी पुण्यास आले ह्मणोन दर्शनास आले आहेत.......हे इतकेंच इच्छितात कीं, धण्याचे पुण्यप्रतापें फिरंगाण सुटावें. झणजे आपले वतन सुटेल हा हेत स्वामींचे प्रतापें सिद्धीस पावेल. संदेह नाहीं. परंतु यांचा अव्हेर न होई तो अर्थ करणार स्वामी धणी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. " . -