पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ चालून त्यास माघार घेणे भाग पडलें. ह्या झुंजामध्यें पोर्तुगीज लोकांचे बरेच लोक जाया झाले. त्यांची सर्व युद्धसामुग्री संपून गेली व द्रव्याचीही तूट पडली. तेव्हां अंटिनियो कार्डिम ह्यानें हताश होउन आपल्या जागेचा राजी- नामा दिला. नंतर त्याचे जागीं पेड्रो डी मेलो (Pedro-de-mello) ह्याची नेमणूक झाली. पोर्तुगीज लोकांस जेर करून साष्टीप्रांत काबीज केल्यानंतर, पावसाळ्यास सुरुवात होतांच, चिमाजी आपा हे, शंकराजी केशव, खंडोजी माणकर इत्यादि रणशूर लोकांस भरपूर सैन्यानिशीं तेथें बंदोबस्तास ठेवून, ता० १ जुलै इ० स० १७३७ रोजी पुण्यास परत आले. तों तिकडे शत्रूनें पुनः उचल खाल्ली. पावसाळा संपतांच गोव्याहून मदत आणून फिरंग्यांनीं वसईचा अधिक बंदोबस्त चालविला. डी मेलो हा नवीन दमाचा सेनापति असल्यामुळे तो मराठ्यांची खोड मोडण्याचा संकल्प करून युद्धाची सिद्धता करूं लागला. त्यानें इ० स० १७३७ च्या आक्टोबर महिन्यांत खांदेरीवर आपले आरमार आणून मराठ्यांच्या केळवे, माहीम वगैरे ठिकाणच्या लोकांस शह दिला. तेव्हां त्याचें व मराठी सैन्याचें युद्ध पुनः सुरू झाले. बाजीराव पेशवे ह्यांनीं रामचंद्र हरि पटवर्धन या शूर सरदाराच्या हाताखालीं कांहीं सरदार व ३२५० लोक देऊन त्यांस केळवें माहीम सर करण्याकरितां पाठविले. परंतु शंकराजी केशव ह्यानें अगोदरच कच खाल्लयामुळे मराठ्यांच्या सैन्यांत थोडी गडबड झाली. १ शंकराजी केशव हा रणशूर योद्धा होता. ह्याने पुढे वसईच्या वेढ्याच्या वेळीं फारच उत्कृष्ट कामगिरी बजाविली. परंतु ह्या समयीं त्याने असा कच कां खाल्ला ते समजत नाहीं ! मराठ्यांच्या पक्षामध्ये ठाणे सर केल्या- नंतर कांहीं रुसवारुसव झाली व अंताजी रघुनाथ वगैरे साष्टी प्रांतांतील मरा- ठ्यांची पक्षाभिमानी मंडळी नाखुप झाली असे आणखी एका पत्रावरूनही दि- सून येतें. हे पत्र खंडोजी माणकर यानें छ २ रबिलाखर ह्मणजे ता० १९ जु- लई इ० स० १७३७ रोजी लिहिलेले आहे. तें येणेंप्रमाणे :- “श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक खंडोजी माणकर चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत. विज्ञा- पना तागाईत छ २ रबिलाखर पावेतों स्वामींच्या कृपावलोकनेकरून वर्तमान