पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ व्यांनीं ह्या राजकारणांत मन घातलें व स्वधर्मसंरक्षणार्थ फिरंग्यावरील मोहिम हाती घेतली, असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. , , पोर्तुगीज लोकांनीं साष्टीप्रांतांत इतका कहर उडवून दिला व हिंदुप्रजेस त्राहि त्राहि केलें ही गोष्ट ब्रकेंद्रस्वामींस केव्हां समजली व त्यांनीं ह्या धर्मसंरक्षणाच्या कामांत केव्हां लक्ष घातलें, हें बरोबर समजण्यास कागदपत्रांचा अस्सल पुरावा अद्यापि उपलब्ध झालेला नाहीं. तथापि ज्याअर्थी शाहु महा- राज, बाजीराव व चिमाजी आपा ह्यांचे सर्व लक्ष तिकडे लागून, त्यांना आपले धर्मरक्षणाचें ब्रीद पाळण्याकरितां ह्या राजकारणाचा अगत्यवाद धरणे भाग पडलें, त्याअर्थी स्वामींसारख्या स्वधर्मसंरक्षणार्थ अवतीर्ण झालेल्या महात्म्यास त्याचा वृत्तांत प्रथमपासून अवगत असावा असे मानण्यास जागा सांपडते. चि माजी आपा ह्यांचें छ० १० जिल्हेज (ता० ३१ मार्च ३० स० १७३७ ) चें पत्र (लेखांक ४७) उपलब्ध झाले आहे. त्यावरून इ० स० १७३७ ह्याव र्षापासून या फिरंगीप्रकरणामध्ये स्वामींच्या आशीर्वादाचा प्रवेश झाला होता हें अस्सल पुराव्यानेंच सिद्ध होत आहे. ह्या पत्रांत चिमाजी आपांनी “स्वा- मींच्या आशीर्वाीदकरून" पुण्याहून स्वार होऊन ठाणें हस्तगत केल्याची बातमी स्वामींस कळविली आहे, व पुढील कार्य “जे होणं तें स्वामींच्या आशी- र्वाद होईल” असे लिहिले आहे. तेव्हां येथून स्वामींच्या मसलतीस उघड उघड प्रारंभ झाला असे ह्मणण्यास हरकत नाहीं. चिमाजी आपा ह्यांनीं इ० स० १७३७ च्या मार्च महिन्यांत फिरंग्यावरील मसलतीस सुरुवात केली व मोठ्या पराक्रमानें त्यांच्याशीं अनेक युद्धप्रसंग करून त्यांचा पराभव केला. ह्या मोहिमेमध्ये मार्च महिन्यापासून जुलई महिन्यापर्यंत चिमाजी आपा व त्यांच्या हाताखालील रणशूर मराठे सरदार ह्यांनी ठाणें, बेलापूर, बेसावें, वानरें, आणि साष्टी इतक्या पोर्तुगीज लोकांच्या बळकट जागा सर केल्या व त्यांना अगदीं जेरीस आणिलें. साष्टीसारखी बळकट जागा मराठ्यांनी ता० २७ मार्च ३० स० १७३७ रोजीं फत्ते केली, त्यामुळे पोर्तुगीज लोकांचा अतिशय हिरमोड झाला. त्यांचा सेनापति अंटिनियो कार्डिम (Antinio Cardim) ह्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर एकसा- रखी टक्कर दिली. परंतु शेवटीं त्याचा मराठ्यांच्या शौर्यापुढे कांहीं उपाय न