पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ त्वेष उत्पन्न झाला व त्यांनी मराठ्यांशी प्रत्यक्ष युद्ध आरंभिलें. इ० स० १७३७ मध्ये त्यांनी आपल्या ताब्यांतील कोटकिल्ले खंबीर करण्याचें व दारूगोळ्याची पोक्त बेगमी करण्याचें काम जोराने चालविलें. ठाण्याचा किल्ला बांधण्याचें काम त्यांनी ३० स० १७३४ पासून चालविलें होतें. परंतु ते अद्यापि पुरें झालें नाहीं. ह्मणून ते हिंदुलोकांची वेठ धरून त्यांच्याकडून जुलुमानें काम घेऊं लागले. त्यांचा धर्मसंबंधानें परोपरीनें अगोदरपासून छल चालला होताच. तशांत लोकांवर हा असह्य जुल्लूम होऊं लागल्यामुळे त्यांना फिरंग्याच्या पारतं- त्र्यांतून केव्हां मुक्त होऊं असे वाटू लागले, व त्यांच्या पुढान्यांनी पेशव्यांना स्वसैन्यानिशीं साष्टीप्रांतावर चालून येण्याबद्दल विशेष आग्रहाची विनंति केली.' अर्थात् हिंदुलोकांचा अशा रीतीनें छल होत आहे असे पाहून, पेश- १ पोर्तुगीज लोकांच्या जुलुमाबद्दल इंग्रज ग्रंथकार कांहीं विशेष मजकूर लिहीत नाहींत. तथापि त्यांच्या अस्पष्ट व त्रोटक माहितींत देखील त्याबद्दल पुरावा सांपडतो. डानव्हर्स साहेबांच्या इतिहासांत, ठाण्याचा किल्ला तयार होण्यास विलंब लागला व त्यामुळे लोक त्रासून जाऊन मराठ्यांचे राज्य बरें असें ह्मणूं लागले, असा अगदी स्वच्छ उल्लेख आहे:- “This delay caused great discontent to the people of that town, besides which those employed in its erection were unpaid and unfed. The latter were at last driven to such desperation that they invited the Mahrattas to take possession of the island of Salsette, preferring the rule of those barbarians to their present persecutions and oppressions. "-The Portuguese in India. Vol. II. Page 402. , ह्या उतान्यांत "barbarians " हा शब्द साहेबमहसुफांनी मराठ्यांस लाविलेला आहे हे वाचकांच्या ध्यानांत येईलच, अर्थात् 'रानटी' मराठ्यांची सत्ता पत्करली पण हा पोर्तुगीज लोकांचा छल व जुलूम नको, अशी साष्टी प्रांतांतल्या लोकांची स्थिति झाली होती, असे इंग्रज इतिहासकार देखील कबूल करितात. त्या अर्थी ह्या छलाचें व जुलुमाचें स्वरूप फार भयंकर असले पाहिजे असे मा नणे भाग पडते. व ह्यावरून मराठी कागदपत्रांतून किंवा बखरींतून ह्या संबंधानें दिलेलें वर्णन केवळ अतिशयोक्तीचे आहे असे ह्मणवत नाहीं ! , "