पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ विचारास येत नाहीं. असा अपेशी आहे. त्यास आपण ठेवावें हें आमचे वर्षा दोन वर्षांनी आपणास अनुभव येईल. आमचा चाकर आह्मी मारिला कुटिला तरी चाकर. ज्यांणी आपल्या बाईकांस उदक घालून गेला तो आपणास कामास काय येईल ? बाईका टाकून जावें कीं काय ? आपण थोर आहेत. हा अर्थ आपल्या ध्यानीं येऊन गेलाच आहे. आपल्या कार्यास पुरुषलोक जो येईल तो मतलवाकरितां हातीं घ्यावा. परंतु आमचा चाकर आपण न ठेवावा. आमचा आम्हांकडे पाठवावा. ते गोष्ट आपले विचारास येणार नाहीं. परंतु लिहिले आहे. या उपरी ज्यांणीं ज्यांणी कल्पना वाढविल्या आहेत, त्या दूर करून भेटीचा लाभ दिला पाहिजे. उभयतांचे जोडीखेरीज आह्मांस दुसरी जोडी विशेष आहे ऐसें नाहीं. मनोमन साक्ष आहे. उत्तराचा मार्ग लक्षितों जाणिजे रवाना छ १२ माहे रबिलावल बहुत काय लिहिणें कृपा असों दिली पाहिजे हे विनंति ” . . . वरील पत्र वाचलें ह्मणजे संभाजी आंग्रे हा बाजीरावार्शी व त्यांचा स्नेही मानाजी आंग्रे यार्शी दुष्टभाव धरील अशी कल्पनाही करवणार नाहीं. परंतु ३० स० १७३७ मध्ये त्यानें पोर्तुगीज लोकांस अनुकूल करून कुलाब्यावर पुनः स्वारी केली, व मानाजीशीं युद्ध आरंभिलें. हें वर्तमान पेशव्यांस कळ- तांच त्यांनी कोंकणांत उतरून फिरंगी व संभाजी ह्यांना मागे हटविलें; व मानाजीचे संकट नाहींसें करून त्याजकडून, शाहु महाराजांस ७००० रुपये रोख खंडणी व ३००० रुपयांच्या परदेशीय कलाकुसरीच्या जिनसा प्रतिवर्षी नजर देण्याचा ठराव करून केला.” बाजीराव पेशवे ह्यांनीं फिरंगी लोकांचा पराभव केल्यामुळे त्यांस अधिक १ मानाजी व संभाजी आंग्रे ह्यांच्या वादाची भानगड बरोबर समजण्यास पुष्कळ कागदपत्र उपलब्ध झाले पाहिजेत. त्यावांचून त्यांतील सर्व गोष्टी बरोबर समजणार नाहींत. ह्यांच्या भांडणामुळे मराठ्यांच्या सत्तेचें फार नुकसान झा लेले आहे. वर दिलेली त्रोटक माहिती ग्रांटडफ, डानव्हर्स, लो वगैरे इंग्रजी ग्रंथ व कांहीं अस्सल कागद ह्यांच्या आधाराने दिली आहे. त्यावरून ह्या भांडणाचे फक्त ठोकळ स्वरूप लक्षांत येईल.