पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ रा० चिंतो कृष्ण यांस आपांनी पाठविलें. बेलभाकर पाठविली. त्यावरून संतोष होऊन समाधान जाहले. त्याप्रमाणे आह्मी बेलभाकर पाठविली. ऐशास आजिपर्यंत नानाप्रकारें घालमेली घालून आपल्या व आमच्या चित्तास विपर्यास घातला होता तो दूर होऊन, आपण उभयतां बंधु तैसे तिसरा ऐसे आम्हांस लक्षून, कोंकणप्रांतींचे गडकोट आपले वरघाटीचा मनसबा आमचा, ऐसी एक बात करून भाऊपणे चालावें. सर्व संपदा आहे हे आपली आहे. याउपरी आह्मी दुसरा विचार चित्तांत आणीत नाहीं. मुख्य गोष्ट आपली आमची एकवेळ त्रि. वर्गाची भेट दसरामानीं व्हावी भेटीनंतर सर्व मनोरथ पूर्ण होतील. जें आम्हांस संकट ते आपण दूर करावें. आपणांस अगत्य तें आह्मीं करावें. तेथें दुसरा विचार असेल तरी श्री कानोवाची व खासे यांचे पायांची शपत आहे. रंगाच्या मोटा बांधणे नाहीं. राव, आपण आम्हांस जैसे सेखोजीबावा तैसे. आपण आह्मी रागावलों तरी क्षमा करावी. दुसरियाचें न ऐकावें. सेखोजीबावास आम्हीं रागे- जोन नानाप्रकारें बोलत होतों, कीं नव्हतों ते आपणास विदित आहे. वडील- पण जेथें आहे त्यांणीं चार तुटीच्या गोष्टी घेऊन भाऊपणाचे जातीने चालवावें ऐसें श्रीनें सामर्थ्य दिले आहे. परिहार कोठपावेतों ल्याहावा. जसे आपण तैसे आम्हांस लक्षून चित्ताची सोज्वलता करून चित्तापासून भेटीचा योग कोणे कोणे महिन्यांत होईल येविशींचा सिद्धांत करून लेहून पाठवावा. सुवर्णदुर्गी अगर रसालगडीं दोनी स्थळे आहेत, यांत जेथे आपले विचारास येईल तेथे होईल. राजश्री आपांनीं चित्तावरी गोष्टी धरिली आहे ती सांगतील. ह्याप्र- माणें ममतापूर्वक उत्तर पाठवावे. लक्ष पत्राचे जागा हे पत्र मानून चित्तांतील किल्मिष दूर करून भेटी द्यावी. आम्ही आपले चित्तापासून लेहून पाठविलें आहे. आपल्या खेरीज दुसरा विचार नाहीं. याउपरी वडीलपणास येईल ते करावें. आपण आह्मांस वडील आहेत. बुद्धिवाद वरचेवरी आज्ञा करीत जावी. जैसा पांडवांचा अभिमान श्री कृष्णानें धरून कौरवांस नतीजा देऊन हस्तनापुरीं स्थापना केली, याप्रमाणे आपल्यास करावें लागेल. आपण जे गोष्टी सांगतील ती आह्मांस प्रमाण आहे. राजश्री रघुनाथजी आपणाजवळ जाऊन राहिले आहेत. त्यास अपेशी आहे. खाशाजवळ होते त्यास खाशास व नारो- पंतास मूठ मारून दिवंगत केले. त्यामागें रा० सेखोजीवावांस तीच गत केली. ,