पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० खरा भाग बिलकूल राहिला नव्हता. पोर्तुगीज, इंग्रज, व पेशवे ह्यांच्याशीं जशी संधि पडेल त्याप्रमाणेच तो वागत असे. सिद्दी साताचें युद्ध होऊन मराठ्यांची सरशी झाल्यानंतर त्यानें बाजीरावास जे पत्र लिहिले आहे, त्यांत इतकी साखर पेरिली आहे व इतका घरोबा दाखविला आहे कीं सांगतां सोय नाहीं. हे पत्र वाचलें ह्मणजे संभाजी आंग्रे ह्याचा स्वभाव मायावी व कपटप्रचुर असावा असे सहज अनुमान होतें. हे पत्र मनोरंजक व महत्त्वाचे असल्यामुळे येथे सादर केल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं. “राजश्री बाजीराव पंडित प्रधान दाजी गोसावी यांसः - - @ सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य से संभाजी आंगरे सरखेल रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केले पाहिजे. विशेष. आपण उत्तर प्रांताहून स्वारीहून आले, हे श्रवण होऊन संतोष जाहला. सर्वदा पत्र पाठवून परामर्ष करावा हें वडीलपणास उचित आहे. वरकड वडिल वडिलांचा भाऊपणा अकृत्रिमतेनें चालोन गेला. त्यामागें तीर्थरूप राजश्री सेखोजीबाबाचा व आपला भाऊपणा विशेषच चालिला होता. परंतु श्रीनें त्यांस दिवस थोडके केले. त्यामागे आपण भाऊ उभयतां, तिसरा आपला बंधु, ऐसाच वडिलोपार्जित स्नेह चालावा. त्यास कालवशेकरून आम्हांपासून अंतराय जाहला किंवा आपणाकडून जाहला, कित्येक संकल्पविकल्प वाटोन गेले, त्यांचं परिमार्जन होऊन पूर्ववत्प्रमाणे भाऊपणा चालोन एकाविचारें वर्तावें याजकरितां आपण शपथपूर्वक पत्र पाठविलों कीं, एकवेळ आपली आमची भेट व्हावी भेट जाहाल्यावर जे जे किल्मिष उभ यपक्ष वाढले आहेत ते दूर होऊन, चित्तास चित्त मेळवून, दोनी मनसचे एकच ऐसें लक्षून, भाऊपणा दिवसेंदिवस वडिलांपासून चालिला त्याप्रमाणे, किंबहुना अधिकोत्तर चालावा ऐसाच हेत चित्ताचा होता. त्यास आपली स्वारी उत्तरेस जाहली तेव्हां तो योग एकीकडे राहिला. अलीकडे राजश्री चिमाजी पंडित यांची स्वारी कुलाबाप्रांती सिद्दी साद याजवरी जाहली. त्यास श्री कृपेनें नतीजा देऊन माघारे फिरले. तेव्हां आपांनी एक कारकून पाठविला, आणि भाऊपणाच्या ममतेच्या कित्येक गोष्टी सांगोन पाठविल्या. त्यावरून आह्मीं आपांस प्रत्योत्तरें लेहून राजश्री नारो काशी यांस पाठविले. त्यांचे समागमें