पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ मक उडाली. ह्या संबंधाचे पेशव्यांचें एक पत्र उपलब्ध झाले आहे. तें येणेप्रमाणे :- “अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री शंकराजी केशव गोसावी यांसीः- सेवक बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार सु। खंमस सल्लासीन मया अलफ. तुझीं पत्र छ० १९ सावानचे पाठविलें, तें छ० २२ साबानीं प्रविष्ट जाहलें. छ० १८ सावानों फिरंगी यांचे लोक राजश्री मानाजी आंग्रे यांचे मोर्चावरी निघाले होते. याजकरितां मशारनिल्हे व राजश्री खंडोजी माणकर व सारे लोक एकत्र बोलावून मशिदीस वेढा घालून, मोर्चा त्यांनीं दिला होता तो चो- पावा या विचारें गेले. मेढीयाचा दरवाजा तोडिला. फिरंगी यांनी मार सीमेपरता केला. लोक जखमी फार जाहले व कांहीं ठार जाहले. मार न सोसे. मग निघाले. जखमी यांची याद आलाहिदा पाठविली असे. ह्मणोन लिहिले तें कळले. लोकांनीं कष्ट मेहनत फार केली. शाबास ! तुझीं सर्वाचीं समा- धानें करणें. दारू व गोळा कल्याणाहून पाठवायाविषयों राजश्री वासुदेव जोशी यांस लिहिले आहे. व आह्मी येथून दारुगोळा लिंबाजीपंत याजब- रोबर रवाना केलाच आहे. आणखीही पाठवून देतों. जाणिजे. छ० २३ साबान आज्ञाप्रमाण." - ह्यानंतर बाजीराव ता० ४ फेब्रुवारी ३० स० १७३५ रोजीं स्वतः कुला- ब्यास गेले; व कुलाबा, राजमाची, खांदेरी वगैरे किल्ले हस्तगत करून व संभाजीस नतीजा पोहोंचवून ता० ३ एप्रिल ३० स० १७३५ रोजी परत आले. ह्यापुढे संभाजीही मराठ्यांशी स्नेह करण्यास तयार झाला. तेव्हां बाजीराव पेशवे ह्यांनीं शाहु महाराजांच्या आज्ञेनें त्याच्याशीं तह ठरवून मा नाजीस कुलाबा व 'वजारत माव' हा किताब दिला; व संभाजीस सुवर्णदुर्ग व 'सरखेल' हें पद दिले. परंतु त्यामुळे पोर्तुगीज लोकांच्या मनांतील डाव कमी न होतां, उलट तो अधिक वाढला; व त्यांनीं मानाजीचा सूड उगवि ण्याचें मिष करून मराठ्यांशीं युद्ध आरंभिलें. संभाजीनें बाह्यात्कारें जरी मानाजीशीं सख्य जोडिलें, तरी त्याचा नाश करण्याची दुर्बुद्धि त्याच्या मनांतून नष्ट झाली नव्हती. त्यामुळे त्याच्या बोलण्यांत किंवा वर्तनांत ,