पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ लोकांवर जबरदस्त कर वसवून तो जुलुमानें घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते लोक अगदर्दी असंतुष्ट व बेदिल झाले. त्याचप्रमाणे इतर हिंदुलोकही पोर्तु- ते गीज लोकांच्या नानाप्रकारच्या जुलुमांस अगदर्दी त्रासून गेले होते. त्यामुळे सर्वोस ह्या धर्मछलापासून केव्हां मुक्त होऊं अर्से होऊन गेलें. ह्या सुमारास मराठ्यांचें सर्व लक्ष हबशांच्या राजकारणांत गुंतल्यामुळे त्यांना हा फिरंग्याचा मनसबा कांहीं दिवस हातीं घेतां आला नाहीं. परंतु पुढे हबशीप्रकरण संपल्यानंतर, पेशव्यांनी मानाजी आंग्रे व संभाजी आंग्रे ह्या उभय बंधूंमधील वैरभाव नाहींसा करण्याचा प्रथम प्रयत्न केला. ह्या वैरभा- वामुळे फिरंगी लोकांस व हवशांस कोणाचा तरी पक्ष घेऊन मराठ्यांच्या प्रांतांत ढवळाढवळ करण्यास फार संधि सांपडत असे. त्यामुळे त्यांना प्रथम हें गृह- छिद्र बंद करणे अगदीं आवश्यक झाले. मानाजी आंग्रे ह्यानें प्रथम पोर्तु- गीज लोकांचें साहाय्य घेऊन कुलावा घेतला. तेव्हां संभाजीनें त्यांचे पारि- पत्य करण्याकरितां त्यावर स्वारी केली. मानाजीनें पेशव्यांची मदत घेऊन स्वसंरक्षणाचा प्रयल चालविला. मानाजी पेशव्यांस मिळाला हे पाहून पोर्तुगीज लोकांचें त्यांचें वांकडें आर्ले, व त्यांनी कांहीं वेळ संभाजीची बाजू स्त्री- कारून मानाजीशीं युद्ध चालविले. तेव्हां बाजीराव पेशवे ह्यांनी शंकराजी केशव व खंडेजी माणकर वगैरे लोकांस त्यांचे मदतीस पाठविलें. ह्या लो- कांची व फिरंगी ह्यांची ता० २ जानेवारी इ० स० १७३५ रोजी बरीच चक- नंतर १ ही हकीकत मि० फ्रेडरिक चार्लस डानव्हर्स ह्यांच्या “The Portuguese in India, " ह्या पुस्तकाच्या आधारें दिली आहे. त्यामध्ये डाम लुई बोतेलो ह्याने कोळ्यांवर जो कर बसविला, त्याबद्दल पुढील वाक्यें लिहिलेली आहेत:- "His first project was to construct a fleet of small vessels for the defence of the coast against the depredations and in- sults of the Angria.........To this end he demanded a heavy tribute from these same fishermen in order to provide the necessary funds. The demand was, however, considered an act of great_injustice by the fishermen, and the collection of the tax had, in many cases, to be carried out by means of force." Page 401., Vol. II,