पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ जाधवराव ह्यांस रवाना केले. व आपले मेहुणे कृष्णराव महादेव यास त्यांच्या मदतीस पाठविलें. पिलाजी जाधवराव ह्यांनीं गंगाजी नाईक व अंताजी रघुनाथ ह्यांच्या साहाय्याने कांव्यास वेढा घातला. खाडर्डीत उड्या घालून फिरंग्यांचे मचवे घेतले. त्या मचव्यांवर त्यांस दारूगोळा व बारा तोफा सांप- डल्या. त्याच तोफा लावून त्यांनी मोठ्या पराक्रमानें माडी फोडिली व फिरं- व ग्यांचा नाश करून त्यांचा अगदीं पराभव केला. तदनंतर त्यांची व फिरं- ग्यांची ता० २७ फेब्रुवारी इ० स० १७३१ रोजीं मनोहर येथे लढाई झाली. तीत मराठ्यांची सरशी होऊन पोर्तुगीज लोकांचा पराभव झाला. नंतर मराठे व पोर्तुगीज ह्या उभयतांमध्यें तहाचें बोलणें सुरू होऊन कांहीं दिवस हें युद्ध बंद राहिलें. इ० स० १७३२ पर्यंत पोर्तुगीज लोकांचा मुख्य प्रतिनिधि सालडाना डा गामा (Saldanha da Gama ) हा होता. हा इ० स० १७३२ च्या जानेवारी महिन्यांत लिस्वनास गेला, व त्याच्या जागीं काँडे डि सांडो- मिल (Conde de Sandomil ) ह्याची नेमणूक झाली. तो ता० ५ आक्टोबर रोजों गोव्यास येऊन दाखल झाला. त्याचें हिंदुलोकांविषयीं अति- शय वाईट मत असल्यामुळे त्यानें हिंदुस्थानांत येतांच सांवतवाडीचे रामचंद्र सांवत भोंसले ह्यांच्याशीं युद्ध सुरू केलें, व सर्व हिंदु लोकांशीं क्रूरपणाने वागून आपला करडा अंमल गाजविण्यास प्रारंभ केला. अर्थात् मुख्य अधिपतींचा असा कल पाहतांच वसई वगैरे ठिकाणचे पोर्तुगीज अधिकारी हिंदुप्रजेवर जुलूम करूं लागले. ३० स० १७३४ मध्ये दाम लुई बोतेलो (Dom Luiz Botelho ) नामक सेनापति वसईप्रांताच्या बंदोबस्तावर नेमिला होता. त्यानें आंग्रे वगैरे मराठ्यांच्या हल्ल्यापासून फिरंग्यांच्या बंदरांचें संरक्षण करण्याकरितां नवीन जहाजे बांधण्याचा विचार केला. त्यांच्या खर्चाकरितां त्यानें कोळी १ हे रामचंद्र महादेव ह्यांचे बंधु हे रामचंद्र महादेव मरण पावल्यानंतर कल्याणचे सुभेदार झाले. छ १४ रबिलाखर सन इहिदे सलासीन झणजे ता० १६ आक्टोबर इ० स० १७३० रोजी लिहिलेल्या बाजीरावांच्या पत्रांत ह्यांस मामलत दिल्याचा उल्लेख आहे. त्यावरून इ० स० १७३० साली रामचंद्र महादेव मृत्यु पावले असे दिसते.