पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

· त्याप्रमाणे अंताजी' रघुनाथ व रामचंद्र रघुनाथ कावळे देसाई व देशपांडे वसई वगैरे प्रांत फिरंगाण, ह्यांनीही पेशव्यांकडे जाऊन हे स्वधर्मसंरक्षणाचें महत्कार्य सिद्धीस नेण्याबद्दल त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. बाजीराव बहाळ यांनी छ १९ रजब सु॥ सल्लालीन मया व अलफ (ता० २८ जानेवारी ३० स० १७३०) रोजी रामचंद्र रघुनाथ ह्यांस पत्र लिहून “आमचेही चित्त हाच हेत आहे की कार्य करावें. अशा निमित्तें रा० अंताजीपंतास जे सांगणे ते सांगितले आहे. तुझीं आपली खात्री निशा करून कार्य साधणे. तुमचें ऊर्जित करूं." असे अभिवचन दिलें. चिमाजी आपांनीं, अंताजी रघुनाथ यांस छ २२ साबान ( ता० १ मार्च ३० स० १७३०) रोजी लिहि- लेल्या पत्रांत, " अवघा प्रसंग सत्य भासून कर्तव्य असेल ऐशीच आज्ञा करावी. नाहींतर दुराशेत गुंतावें सारिखें नाहीं ह्मणून लिहिलें; ऐशियास अवघा प्रसंग तुह्मीं प्रत्ययास आणून दिल्हा आहे. त्यास अनृत काय निमित्त भासेल ? अवघा प्रसंग सत्यच आहे व कार्यही कर्तव्य आहेच आहे. तुझीं चित् संशय आणावा असा अर्थ नाहीं. असे उद्गार काढिले आहेत. ह्यावरून पेशव्यांस हा मनसवा हाती घेण्याची इच्छा होती, हे उघड आहे. ह्यानंतर बाजीराव पेशवे ह्यांनीं शाहु महाराजांची भेट घेऊन ह्या मसलतीवर पिलाजी " १ अंताजी रघुनाथ ह्यांच्यावर पोर्तुगीज लोकांनी फारच जुलूम केला होता. त्यांची बतनें बगैरे जप्त करून व त्यांस 'इनकिझिशन' मध्ये आणून, त्यांस कडक शासन करण्याचा प्रयत्न केला होता. बाजीराव पेशव्यांनी मुंबईचे गव्हरनर जॉन हॉर्न ह्यांचे मार्फत पोर्तुगीज लोकांकडे त्यांच्याबद्दल रदबदली केली; पण तिचा उपयोग झाला नाहीं. ह्मणून ते फिरंग्यांच्या हद्दींतून निसटून मरा ट्यांस येऊन मिळाले होते. चिमाजी आपांच्या एका पत्रांत "तुझी फिरंगी यांचे परम शत्रु आहां है फिरंगी यास फारच असह्य. ह्यास्तव तुली फिरंगी याचे सरहदेपासून चहूं पांचा कोसावर राहवें" असा उल्लेख आढळतो. ही अंताजी रघुनाथ ह्यांची पत्रे व माहिती आमचे मित्र व प्रसिद्ध कवि रा. रा. गंगाधर रामकृष्ण मोगरे ह्यांनी दिली.