पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ गुप्त वाटा व दर्याचे लाग साधून मराठ्यांच्या सैन्यास वाटेल ती मदत देण्याचें वचन प्रमाण केलें. तात्पर्य, सर्वांनी मिळून हिंदुधर्मावर आलेले संकट निवा- रण्याचा प्रयत्न चालविला. परंतु हा कार्यभाग रामचंद्र महादेव यांचे हातून सिद्धीस गेल्याचे दिसत नाहीं. सहास अशरीन (३० स० १७२२ - २३) ह्या वर्षी गंगाजी नाईक, बु· बाजी नाईक, मुरारजी नाईक, शिवाजी नाईक आणि नारायणजी नाईक साळोखी ज्ञात पाठारे हे मुद्दाम सातान्यास गेले, व तेथे त्यांनी छत्रपति, वा जीराव व चिमाजी आपा ह्यांचें दर्शन घेऊन आपली सर्व हकीकत निवेदन केली. आणि “ आपण पुरातन वसईप्रांताचे वतनदार आहों. त्यास वसई- प्रांत फिरंगी याकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म याचा लोप केला. हिंदुलोक भ्रष्टावून क्षार केले. आपण पुरातन वतनदार, देश- नाडगौडपणाचें वतन होतें. त्यास, फिरंगी याकडे तो प्रांत जाहलियापासून वतन चालों देत नाहीं. याजमुळे आपण कुटुंबसहवर्तमान त्या प्रांतांतून येऊन कल्याणप्रांत प्रस्तुत राहिलो. वसईप्रांताची हकीकत व आपले वृत्त निवेदन करून त्या प्रांतीं साहेबीं मसलत करून, प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करून स्वधर्मस्थापना होय ते गोष्ट करावी; व आपले वतन आपणास करून द्यावें.” अशी विनंति केली. आणखी “त्या प्रांतींचे कोट किल्ले व जंजिरे वसई व कोट ठाणें या जागांचे लाग, माग, व खाडियांचे उतार व मार्ग वाटांस आपण माहीत आहों व ठाणें वसईकोटाचे लाग आपले स्वाधीन आहेत.” ते साधून देऊन मराठ्यांच्या सैन्यास तो प्रांत मिळवून देऊं असें कबूल केलें. शाहु महाराजांनीं व पेशव्यांनीं त्यांची विनंति ऐकून घेतली व त्यांचें संकट निवारण करण्याचेंही वचन दिले. परंतु इतर अनेक राजकीय मनसव्यांमुळे त्यांना ह्या मसलतींत लवकर लक्ष घालण्यास अवधि सांपडली नाहीं. तथापि गंगाजी नाईक प्रभृति मंडळींनीं प्रतिवर्षी पेशव्यांस भेटून फिरंग्याचा मनसबा हाती घेण्याबद्दल त्यांना एकसारखा तगादा चालविला होता. ● गंगाजी नाईक प्रभृति पाठारे मंडळींनी पेशव्यांच्याकडे संधान बांधिलें होतें ५