पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ कुलाव्यास सेखोजी आंग्याकडे जाऊन, पोर्तुगीज लोकांचा मुलूख सर करावा व स्वधर्माचें रक्षण करावें, म्हणून गुप्त रीतीने प्रयत्न चालविला. परंतु ती बातमी फिरंगी ह्यांस पोहोंचून त्यांनी गंगाजी नाईकांस कैद केलें, व त्याजपासून दंड घेऊन त्यास सोडून दिले. गंगाजी नाईकांप्रमाणेच त्यांचे बंधु बुवाजी नाईक ह्यांनी पंढरपुरास जाऊन तेथून देहूकर साधु तुकाराम ह्यांचे चिरंजीव नारायणबोवा गोसावी ह्यांचे मार्फत खंडेराव दाभाडे सेनापति ह्यांचेकडे कांहीं संधान बांधिलें. सेनापति बहुत खुष झाले व त्यांनी, नारायणबोवांच्या समझ, विठोबाचे देवालयांत, असे मान्य केले की, “जर तुमचा मुलूख आह्मांस मिळाला तर तुमचें सर्व साहित्य आह्मी करूं. तुमची वतने चालू होतील. परंतु आमचे नांवें निशाण मात्र चालवावे. वरकड जमीनदारी व आमचा अंमल तुह्मींच चालवावा.” ह्या नंतर बुबाजी नाईक परत कोंकणांत गेले, व त्यांनी आपल्या बंधूस सविस्तर वर्तमान निवेदन केले. व , ह्याच वर्षी - ह्मणजे ३० स० १७२० मध्ये बाजीराव पेशवे ह्यांचे मेहुणे रामचंद्र महादेव जोशी चासकर ह्यांनी कल्याणप्रांताचा निंमा अंमल घेतला व कल्याण येथे पेशव्यांचे ठाणे बसविलें. खुद्द मराठ्यांचा सुभा कल्याणास स्थापन झाल्यामुळे, गंगाजी नाईक वगैरे मंडळींस सेनापति दाभाडे ह्यांच्या फौजेची मदत घेण्याची अवश्यकता राहिली नाहीं. त्यांनी चिंचवडचे श्री देव गोसावी यांच्या मार्फत, कल्याणचे सुभेदार रामचंद्र महादेव ह्यांच्याशीं, फिरंगी लोकांच्या राजकारणाचें बोलणं लाविले. त्यांनी त्यांची एकांत भेट घेतली; आणि पेशव्यांच्या शिक्केकट्यारीची आणभाक घेऊन आपला सर्व वृत्तांत निवेदन केला. “आमचा प्रांत आमची मायभूमि तिचा जो राजा आहे तो दुष्ट आहे. त्यानें आमची वतनें बुडविलीं. मुलखाचा देवधर्म बुडविला. आमचे लोक बाटविले. असा उपद्रव करीत आहे ह्मणून आपलेपाशी आलों" असे मोठ्या दीनवाणीनें सांगितले. तेव्हां रामचंद्रपंतांस त्यांची दया आली, व त्यांनी पेशव्यांच्या मार्फत त्यांच्या दुःखाचा परिहार करून त्यांचें इष्टकार्य सिद्धीस नेऊ, असे अभिवचन दिले. नंतर गंगाजी नाईकांनी आपले साथी- दार लोक रामचंद्रपंतांस भेटवून, ठाणे, वसई, धारावी वगैरे ठिकाणच्या