पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ वगैरे प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत आला व फिरंगी लोकांस आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास मुळींच अवकाश सांपडला नाहीं. तथापि त्यांनी साष्टी प्रांतास पुष्कळ उपसर्ग देऊन हिंदुधर्माचा विध्वंस करण्याचा एक सारखा सपाटा चाल- विला होता. त्या योगानें तेथील हिंदुप्रजा अगर्दी त्रस्त होऊन गेली होती. साष्टीच्या बखरीमध्यें पोर्तुगीज लोकांच्या जुलमामुळे हिंदुलोकांची कशी दीन स्थिति झाली होती ह्याचें फार हृदयद्रावक वर्णन दिले आहे. तें येणें- प्रमाणे :- "ठाणे ह्मणजे बिम्बस्थान है राज्य फिरंगी त्यांनीं घेऊन कुबुद्धि धरिली जमीनदारांचीं वतने बुडविलीं. गांवाचे गांव घेऊन बाटविले. • किरिस्ताव केले. सासष्ट गांवचे व आगर वसईचे बहुतेक लोक धरून बाटविले. घरांत कोणी नसले तर पोरें नेऊन बाटवावीं. असा उपद्रव महाराष्ट्रांत मांडिला कोणी दक्षिणेंत पळून गेले. क्रियाकर्मातराचा लोप झाला. देवधर्म बुडाला. प्रांतांतील तीर्थे क्षेत्रे सर्व लोपलीं. देवालयें फोडून साफ केलीं. फिरंगी यानें आपलीं देवळें बांधिलीं. फिरंगीधर्म चालवायास लागले. ब्राह्मणास मुलखांत फिरण्याची बंदी झाली. कोणी कांहीं व्रतें, उद्यापनें, होम वगैरे आरंभिलीं ह्मणजे त्यांचें घर वेढलें. शेजारी पाजारी त्या घरांत सांपडले ह्मणजे त्यांसही धरून न्यावें. उत्सव वगैरे चोरून जीव वांचवून करूं लागले. असा अनर्थ मांडिलां.” इ० इ०. अशा रीतीनें पोर्तुगीज लोकांनीं त्राहि त्राहि केल्यामुळे सर्व हिंदुलोक मराठी साम्राज्याच्या अधिपतींस शरण जाऊन स्वसंरक्षणाचा प्रयत्न करूं लागले असतील ह्यांत आश्चर्य नाहीं. साष्टीच्या बखरीवरून असे दिसून येतें कीं, छत्रपति संभाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून हा धर्मछल चालू होता. त्या वेळींच पाठारे जातीचे हिंदुलोक पोर्तुगीज लोकांच्या उपद्रवामुळे त्रासून जाऊन केळव्यास येऊन राहिले. नंतर तेथून अणजुरास आले. त्यांचे पुढारी गंगाजी नाईक ह्मणून एक गृहस्थ होते. त्यांनी संभाजी महाराजांकडे संधान लाविलें. परंतु संभाजीच्या कार कीर्दीत मोंगलांची सरशी होऊन सर्व मराठी राज्य विस्कळित झाले, त्यामुळे महाराष्ट्रधर्मरक्षणाचें कार्य सिद्धीस गेलें नाहीं. पुढे गंगाजी नाईक ह्यांनी १ साष्टीची बखर- काव्येतिहाससंग्रह पृष्ठ १. -.