पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५ वा. वसईची मोहीम. ब्रह्मद्रस्वामी ह्यांनीं स्वधर्मसंरक्षणार्थ व स्वजनकल्याणार्थ जीं महत्त्वाचीं राजकारणें चालविलीं, त्यांपैकीं जंजिन्याच्या हबशीप्रकरणाची संक्षिप्त परंतु खरी हकीकत मागील भागांत दिली आहे. ह्या प्रकरणाप्रमाणेच दुसरे प्रकरण वसईची मोहीम ही होय. ह्या मोहिमीमध्यें ब्रह्मद्रस्वामी ह्यांचें अंग विशेष असून ती त्यांच्या सूत्रचालनानें व प्रोत्साहनानें यशस्वी झाली, असें मानण्यास व कोणतीच हरकत नाहीं. परंतु, ह्याही राजकारणाचें खरें स्वरूप परदेशीय इतिहासकारास चांगलेंसें अवगत न झाल्यामुळे मराठ्यांच्या इतिहासांत त्याचें व्हावें तसें आविष्करण झालेले नाहीं. ह्याकरितां, ह्या मोहिमीचा संक्षिप्त वृत्तांत अस्सल कागदपत्रांच्या आधारांनिशीं येथें सादर करितों ह्मणजे, ह्या मह- च्वाच्या राजकारणांत स्वधर्मरक्षणाचा पवित्र हेतु किती अंतर्भूत होता व तो स्वामींनीं कसा सिद्धीस नेला, ह्याची खरी कल्पना वाचकांस करितां येईल. , व १ पोर्तुगीज ह्मणजे फिरंगी लोक हे हिंदुस्थानांत व्यापार करण्याच्या उद्दे- शानें इ० स० १४९७ मध्यें प्रथम कालिकोट येथें आले. त्यांचा प्रमुख सरदार वास्को दि गामा ह्याची व कालिकोटच्या राजाची भेट होऊन त्याला तेथें आश्रय मिळाला. नंतर त्यांनी तेथून एक एक पाऊल पुढे टाकीत गोमांतकांत प्रवेश केला, व तो प्रांत काबीज करून गोवें येथें इ० स० १५१० मध्ये आपली राजधानी स्थापन केली. त्यांचा पहिला गव्हरनर-जनरल आलफान्सो अलबुकर्क हा होय. हा इ० स० १५१५ मध्ये मृत्यु पावला. त्यानंतर त्यांची सत्ता समुद्रकिना-यानें उत्तरेस वाढत गेली, व त्यांनीं गुजराथचा बादशाहा बहादुरशाहा ह्याजकडून ३० स० १५३३ मध्यें वसई घेतली. ३० स० १६६४ मध्यें पोर्तुगीज लोकांचें चांगलंच प्राबल्य होऊन मुंबईकिनान्याचा सर्व भाग त्यांच्या ताव्यांत आला होता. परंतु त्यापुढें युरोपमधून इतर राष्ट्रांतील अनेक प्रतिस्पर्धी मंडळ्या व्यापाराकरितां हिंदुस्थानांत आल्यामुळे त्यांचें माहात्म्य विशेष वाढले नाहीं. ह्याच समयास महाराष्ट्र राज्यसत्तेचा अभ्युदय होऊन कल्याण भिवंडी