पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ . जिवाजी खंडेराव चिटणीस ह्यांनींही, "नौबत वाजविली खुशाली केली. सिद्दी सातासारिखा गनीम मारिला हें कर्म सामान्य न केलें.” असा वारंवार स्तुतिवाद करून, महाराजांनी दिलेली सन्मानाचीं वस्त्रे, हिरेजडित पदक, मो- त्यांची कंठी, व रत्नखचित तरवार इत्यादि बहुमानाचे वस्त्रालंकार चिमाजी आपांस अर्पण केले. “अमृतं स्वामिगौरवम्" ह्या न्यायानें चिमाजी आपांस हे सन्मान स्वीकारण्यांत किती संतोष झाला असेल, व ह्या अमृततुल्य वाप्रसाने त्यांच्या हृदयांतील वीरश्रीस किती प्रोत्साहन मिळाले असेल, ह्याची कल्पना करण्याचे काम रसिक वाचकांकडे सोपविणे योग्य आहे. ह्या सर्व यशाचं वृत्त श्रवण करून ब्रम्हेंद्रस्वामींच्या हृदयांत आनंदाच्या लहरी उत्पन्न झाल्या असतील ह्यांत आश्चर्य नाहीं. ह्या वेळचें स्वामींचें अस्सल पत्र उपलब्ध नाहीं. तथापि, ह्याच वेळी चिमाजीआपांस लिहिलेल्या एका पत्रांत त्यांनीं, "हणमंतासारखें यश तुझांस आले. पुढे श्री अहद रामेश्वर तहद दिल्ली यश देईल. तुझीं वर्तमान लिहिले व चिरंजीव बाजीरावांचीं पर्ने आली हें संतोषाचें वर्तमान ऐकोन, जैसी हणमंताचे गळां रघुवीरें रत्नांची माळ घातली, तैशीं यशाचीं पत्रे पाठविलीं. तुझी राम- रूप जाहले.” (लेखांक २८१) म्हणून जे उद्गार काढिले आहेत, तेच स्वा- मींच्या आनंदातिशयाचे उत्तम निदर्शक होत ह्यांत शंका नाहीं. ह्याच पत्रांत स्वामी लिहितात कीं, “जरी दहा कोटी फौज घेऊन कोकणांत जातेत तरी ऐसें यश कोकणचें न येते; ऐसें पुर्ते आपले ठायीं समजणें रावणासारखा दैत्य मारला !” ह्यावरून ह्या हबशांच्या राजकारणांत स्वामींच्या आशीर्वा- दाचा प्रतापमहिमा कांही अलौकिकच असला पाहिजे असे त्या वेळच्या भाविक जनांस वाटू लागावें व त्यांची स्वामींवर अधिक अधिक श्रद्धा बसावी हें अगर्दी साहजिक आहे. जे