पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व त्यांच्या हेतूप्रमाणें तेथें त्यांचा विजयध्वज फडकू लागला. हें आनंदकारक वर्तमान सखवारवाई राणीनें स्वामींस मोठ्या तांतडीने कळविले आहे (लेखांक २१). ह्यावरून स्वामींच्या प्रयत्नाचें सार्थक झाले असावे असे मानण्यास हरकत नाहीं. अंजनवेल सर केल्यानंतर कांहीं दिवस हवशीप्रकरण विझलें होतें. परंतु पुढे सिद्दी सात पुनः मराठ्यांच्या अमलास खलेल करूं लागला. तेव्हां चि- माजीआपा ह्यांनी कोंकणांत स्वारी करून त्यास नतीजा दिला. सिद्दी सात ह्याची व चिमाजीआपा ह्यांची मुकाम चन्हई नजीक रेवास येथें, मोठी लढाई झाली तींत हा प्रवल हवशी सरदार ता० १९ एप्रिल ३० स० १७३६ रोजी ठार मारला गेला. अर्थात् सिद्दी सातासारखा दुष्ट, हिंदुधर्मद्वेष्टा व महाप्रमत्त असा हबशांचा पुढारी मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्या पक्षाचा अगदी कमजोर झाला. नंतर त्यांनी मराठ्यांशीं कायमचा तह करून त्यांचे सख्य संपादन केलें. . सिद्दी सात हा केवळ एक दैत्य होता. त्याचा पराभव चिमाजी आपांनीं फार शौर्याने केला. ह्मणून ब्रह्मद्रस्वामींनी व शाहु महाराजांनी त्यांचे फार फार अभिनंदन केलं. फत्तेसिंग भोसले व जिवाजी खंडेराव चिटणीस ह्यांनीं महाराजांच्या आज्ञेवरून चिमाजीआपांस संतोषप्रदर्शक गौरवाचीं पत्र पाठविलीं आहेत तीं वाचून त्या वेळी मराठे सरदारांची अंतःकरणें विजयानंदाने कशीं भरून गेलीं होतीं ह्याची चांगली कल्पना करितां येते. फत्तेसिंग भोंसले ह्यांनी लिहिले आहे कीं, “रेवसावरी सिद्दी सात यांशी युद्धप्रसंग जाला. ते समयीं युद्ध तुंबळ होऊन हबशी यांचे हजार माणूस कापून काढिले, व सिद्दी सात खासा ठार जाहला, ऐसें वर्तमान लिहिले. त्यावरून राजश्री स्वामी बहुतसे खु शाल जाले. तुझीं महत्कृत्य केले. सिद्दी सात ह्मणजे केवळ हवशी सिद्दी यांचा मुख्यच होता. तो तुमच्या हातें पराभवातें पावला. थोरसे यश तुझीं जोडिलें. राजश्री बाजीराव प्रधान तिकडे गेले. मांगे तुझीं बरी शिकस्त करून हबशी बुडविला. हबशांचा मूळ कंदच उपटून टाकिला ! चहूंकडे लौकिक विशेषात्कारें जोडिला. तुमची निष्ठा, राजश्रींच्या पायाशी एकनिष्ठ तेनें सेवा करावी ऐसीच आहे. तदनुरूप मोटेंसें यश तुमचे पदरीं पडिलें. सामान्य गोष्ट जाहली नाहीं. आह्मांस बहुत समाधान जाहलें.” त्याचप्रमाणे