पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● याजबरोबर आहेत. त्यास महाराजांचा जोर त्यावर आहे. महाराजांनी पैरवी करून सिद्दी सात यासी हाताखाली घालून आपलेंही कार्य करून घ्यावें. ऐसा त्याजवरीही उपकार करावा. त्याजमध्यें उत्तम आहे. महाराजांनीं विचारें करून कार्य करून घ्यावें. अंजनवेल, गोवळकोट इकडे फौज रवाना करावी, आणि दुरून शह देऊन सिद्दी सात याला हाताखाली घेतला पा हिजे. केवळ मोर्चेबंदी करूनच अतिशय केल्यापेक्षां सहयानें होतां सल्ले घेत- ल्याने बरें होय. महाराज थोर आहेत. कार्य करून घ्यावे. अंजनवेल, गोवळकोट इकडे महाराज फौज पाठवितील. त्यास आधीं गोवळकोटच्या गळां पडों नये. अंजनवेल याच्या गळां पडावें. अंजनवेल आली ह्मणजे गो- वळकोट आला. महाराजांनी फौज रवाना करावी. तिला आधी मुलुक लुटा- वयासी सांगावें मुलुक लुटावयास आठ दिवस लागतील. तोपर्यंत महा राजांनीं सिद्दी सात याचे कागदोपत्रीं कार्य करून घेतले पाहिजे. मोर्चेबंदी- पेक्षां दोहींकडेस कागदींपत्रों कार्य उत्तम होईल. यामध्ये महाराज धनी आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. तोफांखेरीज काम होत नाहीं तोफा पांच सहा पके पंधरा शेर सोळा शेर ऐशा गोळ्यांच्या असाव्या. तरी महाराजांनीं तोफांची तरतूद केली पाहिजे. तोफांखेरीज खर्च होयास संकट आहे. तोफांची तरतूद केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना. " • . ह्या पत्राच्या संदर्भावरून हें पत्र इ० स० १७३४ च्या जानेवारी महिन्यांती- लच असावें असें दिसतें. ह्या पत्राप्रमाणे सिद्दी सात मराठ्यांस अनुकूल झाल्याची माहिती मिळत नाहीं. तथापि त्याच्या एकंदर वर्तनावरून त्यानें स्वार्थ साधण्यासाठीं कांहीं मराठे सरदारांस नादी लावून त्यांशीं सलोखाचें बोलणें लाविलें असावे असे वाटतें. ह्यानंतर एकवर्षपर्यंत-ह्मणजे फेब्रुवारी ३० स० १७३४ पासून ३० स० १७३५ च्या जानेवारीपर्यंत मराठ्यांच्या व हवशांच्या चळवळींची नीटसी माहिती समजत नाहीं. परंतु अंजनवेल गोवळकोट या बळकट जागा सर करण्याचा त्यांचा एकसारखा प्रयत्न चालला असावा, व इंग्रज, फिरंगी, यांस अनुकूल करून घेण्याकरितां अनेक उपाय चालले असावेत, असें अनुमान करिता येतें. शेवटीं, इ० स० १७३५ च्या जानेवारी महिन्यांत मराठ्यांस यश येऊन माघ शुद्ध द्वितीया रोज बुधवार ह्या दिवशीं अंजनवेली त्यांच्या हस्तगत झाली 2 -