पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ स्थळे हस्तगत करून घेण्याकरितां, इंग्रजास अनुकूल करून घेण्याची शाहु महाराजांस व सर्व मराठे मुत्सद्दयांस अत्यंत आवश्यकता वाटणें साहजिक आहे. अशा नाजुक प्रसंग, ब्रह्मेद्रस्वामी ह्यांनी इंग्रजांकडे कांहीं अनुसंधान ला वून, त्यांची शामलास मदत होऊं नये, अशी खटपट चालविली होती. लेखांक ९ ह्या पत्रामध्यें शाहु महाराजांची राणी सखवारबाई इजला स्वामींनी “इंग्रेज बंद करावयास आपण ममईस जावें कीं काय" म्हणून प्रश्न विचारला आहे. त्याचें उत्तर राणीनें, “स्वतःच जाण्याचे प्रयोजन नाहीं, परंतु कार्य होईल असा विचार करावा. आणि जेणेंकरून इंग्रेज बंद होऊन शामलास मदत न करी, आपणांस सल्लख राखे ते करावें.” असे लिहिले आहे. लेखांक १० मध्यें “इंग्रजांची व स्वामींची मैत्री" असल्याबद्दलचा उल्लेख असून, “मैत्रीकीमुळे इंग्रजांस सांगून शामलाची मदत न करीत तो अर्थ केला पाहिजे" ह्मणजे स्वा- मींस गांव देऊ, असे सखवारबाईनें स्वामींस अभिवचन दिले आहे. अशाच प्रका रचा उल्लेख लेखांक १०२ ह्याही पत्रांत आहे. लेखांक २८० ह्या पत्रांत स्वामींनीं, अंजनवेलीस मराठ्यांचे हातून बरोबर मदत होत नाहीं असे पाहून, चिमाजी आपांस, “चहोंकडून सामान न ये! तेव्हां अंजनवेली जेर होऊन आपोआप टाकून पळतील !” अशा अर्थाचा औपरोधिक मजकूर लिहिला आहे. ह्या सर्वो- वरून स्वामींची मूर्ति ह्या हबशांच्या राजकारणप्रसंगांत स्वस्थ बसलेली नसून, गुप्तरूपानें अनेक मसलती करीत होती, व नानात हेचीं सूत्रे फिरवीत होती, असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. , मराठ्यांनी सिद्दी साताकडे कांहीं संधान करून त्यास वश करण्याचाही प्रयत्न चालविला होता. छत्रपतींच्या दप्तरांत सिद्दी सातासंबंधाचें एक पत्र सांपडले आहे, त्यावरून ह्या ह्मणण्यास पुष्टि येते.' हें पत्र येणेप्रमाणे:- ‘“सेवेसी विज्ञापना. महाराजांस सिद्दी सात याचे कागद दाऊद चौपदार - १ ह्या मसलतींत स्वामींचेंहीं अंग असावें असें पृष्ठ २५ मधील टीपेमध्यें दिलेल्या नारो विठ्ठल प्रभूच्या पत्रांतील शेवटच्या मजकुरावरून दिसून येते. त्यांत सिद्दी सातानें स्वामींच्या देवास १२ इनाम गांव देण्याचे कबूल करून मरां- ठ्यांचा वेढा उठविण्याबद्दलचे बोलणे चालविल्याचा उल्लेख आहे.