पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जांचे सेवेसी विनंतिपत्र लिहून राघो नारायण व त्रिंबक विष्णु याची रवानगी करितों; आणि फौजेची रवानगी करणार स्वामी धनी आहेत. शामलाकडील मनसबा स्वामींनीं चित्तावरी धरून दुष्टावरी स्वामींची अवकृपा जाहली आहे. स्वामींच्या तेजाचे प्रभावेंकरून शामलास दंड होईल. स्वामींचे पुण्याचा प्रभाव अगाव आहे. शामलावरी मोहीम स्वामींची झाली. याउपरी सर्व साहित्य करावे लागले. वरघांटीडून दाणा गल्ला देखील कोटा येतील, तरीच लप्करचे फौजेची बेगमी होईल. अन्यथा बेगमी होत नाहीं. मुलकांत गळया- दाण्याची तंगचाई आहे. त्या जागां जाऊन बसावें तेव्हां खातरनिशा करून उठावें, ऐसा दृढ विचार स्वामींनी केला आहे. इंग्रज व फिरंगी यांचा बंद करावा ह्मणजे अंजनवेलीचे खाडींत आरमार जाऊन सामान पावेल. आणि खुपकी व जलमार्गे दोहींकडून पायबंद जाहलियानें काम होईल. येविसीं पेशजीं सविस्तर अर्थ लिहून विनंतिपत्र पाठविले आहे. त्यावरून विदित जाहलें असेल. शत्रूचे पक्ष नाना उपाय करून छेदावे, तेव्हां आशा जागां बिलगोन बरजोर नतीजा देऊन कार्यसिद्धि करावी. मागें फौजा येऊन लोक मनसवा निरर्थक जाहला. दुहीमुळे काम फसावून गेले. इंग्रजांचा मोठा शह आहे. ये गोष्टीचा अर्थ स्वामींनीं बरा चित्तांत आणून, एखादा मातवर माणूस त्याजकडे जाऊन, आरमारास त्याचा शह नव्हे ऐसा विचार स्वामींनीं केला, तरी मोठें कार्य होईल. सेवकास सूचित अर्थ विदित व्हावा ह्मणून लिहून पाठ- विला आहे. पारपत्य करणार स्वामी धनी आहेत. सेवक आज्ञेप्रमाणे जमा- वानिशीं येतो. स्वामींची सेवा वडिलांनी केली, त्यामागें सेवकानें जीवेंभावें श्रमसायास करून निष्ठेनें सेवा करावी, आणि आपला जगनामोश करून घ्यावा, हाच निजध्यास आहे. दुसरा अर्थ सेवकाचे चित्तीं किमपि नाहीं. या उपरी विलंब न लावितां सिताबीने येतों. सेवेसी विदित जाहले पाहिजे हे विज्ञापना. " ह्या पत्रावरून इंग्रजांचं प्राबल्य अंजनवेलीस अधिक असून त्यांचें व फिरंगी यांचें हबशीलोकांस पाठवळ चांगले होते असे दिसते. ह्याचें कारण माना- जीचें व इंग्रजांचें वांकडे आले असल्यामुळे त्यांनीं ता० ५ दिसेंबर इ० स० १७३३ रोजीं हवशाशीं गुप्त तह केला होता. तेव्हां कोणीकडून तरी हीं दोन