पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ देऊन जबरदस्त शह पोंहचे ऐसें केले पाहिजे. अंजनवेलीस सत्वर शह पोंह- चून पायबंद गनिमास बसला ह्मणजे आयास येईल, आणि महाराजांचा बोल वाला होईल. तर अंजनवेलीस फौजा पाठवून लिहिल्याप्रमाणे इकडील बेगमी करून सत्वर पाठविली पाहिजे. बकाजी महाडिक यांनी महाराजांस विनंति- पत्र लिहिले आहे. त्यांत सांवळे गोंधळे करून लिहिले आहे. परंतु त्यांच्याने भांडी येत नाहींत. महाराजांनीं राजश्री संभाजी आंग्रे यांजकडे हुजरे पाठ- वून भांडों देविलों पाहिजेत. भांड्यांखेरीज कांहीं होत नाहीं. भांडीं थोरलीं असाव. तर भांड्यांची बेगमी केली पाहिजे. महाराजांनीं भांडी देविली पाहि जेत. महाडास चोहोंकडून मोर्चे पाहिजेत. त्यास एक मोर्चास पांच हजार माणूस पाहिजे. याविशीं महाराजांनी आज्ञा करावयाची ते केली पाहिजे. येथें सारे आह्मीं किती आहों हें महाराजांस दखल आहे. तर जो हुकूम करणे तो महाराजांनीं केला पाहिजे. भांड्यांस गोळे लोखंडी पाहिजेत. तर तेही सा- हित्य केले पाहिजे. सेवेसीं श्रुत होय ही विज्ञापना. " ह्या पत्रामध्यें “मातवर फौज घांटाखालीं पाठवून अंजनवेलीस वेढा देऊन जबरदस्त शह पोंहचे ऐसें केले पाहिजे. अंजनवेलीस सत्वर शह पोंहचवून गनिमास पायबंद बसला ह्मणजे तो आयास येईल" हा मुद्दा मुख्य असल्यामुळे शाहु महाराजांनी त्याप्रमाणे संभाजी आंग्रे ह्यांस अविलंबे तिकडे जाण्याव द्दल पत्र पाठविले. त्याचे उत्तर संभाजी आंग्रे ह्यांनीं ता० १० फेब्रुवारी ३० स० १७३४ रोजी पाठविले आहे. ते येणेप्रमाणे :- - “श्रीमंत महाराज छत्रपति स्वामींचे सेवेसीः - विनंति सेवक संभाजी आंग्रे कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागाईत माघ वद्य चतुर्थी रविवार पावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामींनीं आज्ञापत्रे दोनचार पाठविलीं, तीं मस्तकीं वंदून संतोषा- वह आनंद झाला. स्वामींनी आज्ञा केली कीं, जमावानिसीं येऊन अंजन- वेली गोवळकोट या स्थलांस शह देणें. मदतीस फौज पाठविली जाईल. कोणे ठिकाणी फौजेस सामील करावी ह्मणोन आज्ञापिलं. आज्ञेप्रमाणे खुपकीच्या जमावाची व आरमाराची तयारी करून, माघ शुद्ध पंचमी इंदुवारी, जंजिरें विजयदुर्गाहून स्वार होऊन खारापाटणावरून जयगडी आल्यावर, महारा-