पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, सुवर्णदुर्ग येथील तोफा आणून जोडणें. मशारनिल्हे माहीत आहेत. त्यांच्या अनुमतें विचार कर्तव्य तो करून कार्यसिद्धि करणे. यांच्या विचारें नाके अस तील तेथें तोफा जोडून प्रयत्न करून, स्थल हस्तगत करणे. " ह्मणून आज्ञा केली. ऐशास आज्ञेप्रमाणे वर्तणूक करून महाराजांच्या पुण्यप्रतापेंकरून स्थल हस्तगत करीतच आहों. परंतु अंजनवेलीकडे मातबर फौज उतरून जबरदस्त शह द्यावा. तेव्हां शामलास पायबंद बसेल. आणि येथें महाडासच चहुंकडून मोर्चेबंदी करावी, व तोफा पंधरा शेर सोळा शेर पक्के गोळ्यांच्या, पांच सहा नाके आहेत तेथें जोडून मार द्यावा. त्याचं सर्व साहित्य दारूगोळ्यांची पोक्ती बेगमी करून चौगीर्द मार द्यावा तेव्हां शत्रू आयास येतील, आणि स्थळ हस्तगत होईल. ऐशास राजश्री बकाजी महाडिक यांजकडून तोफा आणवणं ह्मणोन आज्ञा केली. त्याव रून आह्मीं मशारनिल्हेस बोलावून आणून, राजश्री पवार व अजम शेखमिरा व आह्मीं बसोन विचार केला. तोफांविशीं बहुतांप्रकारें मशारनिल्हेस सांगितले परंतु तोफांचें साहित्य त्यांजकडून होतां दिसत नाहीं. जो जमाव घेऊन आह्मांजवळ आले, त्याहून जास्ती जमाव अगर तोफांचें साहित्य त्यांस येत नाहीं. येविशीं मशारनिल्हे यांनीं सेवेसीं विनंतिपत्र लिहिले आहे, त्याजवरून विदित होईल. आधीं तोफा पाहिजेत; तेव्हां पुढे मनसब करावा. तोफा जोडून मार दिल्या- खेरीज गनीम आयास येत नाहीं. तोफा जरूर पाहिजेत. तर वरकड सा- हित्य जैसे महाराजांनी केले, तैसेंच तोफांची तरतूद हरप्रकारी साहेबीं करून पांच सहा तोफा जबरदस्त पाठविल्या पाहिजेत. महाराजांशिवाय तोफा पोंह- चत नाहीं. तरी तोफा पांच सहा व दारूगोळे सत्वर पोंहचत ती गोष्ट केली पाहिजे. भांडी जोडावी. तेथील बेहबुदीबद्दल बरकंदाज पाहिजेत. तर कांहीं परदेशी व कांहीं कानडे प्यादे ऐसे एकहजार बरकंदाज पाठविले पाहिजेत. व जेजाला शें सवारों व बाण दीडशे व दारूगोळीची विपुल बेगमी करून पाठ- वावी; व मोर्चेबंदीच्या कामावरी कारीगर पाहिजेत. तर बेलदार दोनशें व सुतार पंचवीस व लोहार दुकानें दहा व पाथरवट दहा व तबेलदार दहा येणें- प्रमाणे पाठविले पाहिजेत. सर्व साहित्य सत्वर केले पाहिजे. दिवसेंदिवस गनीम बळकटी करितो. त्याचा उपमर्द सत्वर होय ऐसें करणार महाराज धनी समर्थ आहेत. तिकडे मातबर फौज घांटाखाली पाठवून अंजनवेलीस वेढा , , ●