पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ , वारंवार मदत येत होती. अंजनवेल, गोवळकोट इकडे प्रतिनिधि, फत्ते- सिंग भोसले, आणि मानाजी आंग्रे ह्यांची व शत्रूची एकसारखी झटापट चा- लली होती. त्यांच्याशी झुंज करण्याची शक्ति न राहिल्यामुळे, महाड वगैरे मरा- ट्यांच्या ताब्यांतील प्रांतास उपसर्ग देऊन तिकडे हूल उठवावी व मराठ्यांची फळी फोडावी असा शामलाकडील सरदारांनीं बूट काढिला. तथापि शाहु महा- राजांनी उदाजी पवार, देवराव मेघश्याम, हरि मोरेश्वर राजाज्ञा, शेख मिरा वाईकर, वाजी भिवराव वगैरे निवडक लोक पाठवून त्यांच्याकडून शामलांचें पा रिपत्य होईल अशी तजवीज होती. त्यांच्या व शामलांच्या बऱ्याच लहान मोठ्या चकमकी झाल्या. परंतु मराठ्यांचा जमाव व दारूगोळा कमी असल्या- मुळे आणि अंजनवेलीकडून इंग्रज व फिरंगी ह्यांचें साहाय्य हवशीलोकांस विशेष पोहोंचत असल्यामुळे, शत्रूचा पुरता मोड होईना. त्यामुळे अंजनवेल गोवळ- कोट इकडे शत्रूस जबरदस्त शह देणे मराठ्यांस अवश्य वाटू लागले. ह्मणून शाहु महाराजांनी संभाजी आंग्यास पत्र पाठवून, त्यास ताबडतोब अंजनवे- लीस जाऊन शत्रूस जबरदस्त शह देण्याबद्दल आज्ञा केली. परंतु मानाजी आंग्रे व संभाजी आंग्रे ह्यांच्यामध्ये रहस्य नसल्यामुळे त्याच्या हातून जितक्या प्रामाणिकपणानें स्वामिसेवा व्हावी तितक्या प्रमाणानें ती झाली नाहीं ! - महाडच्या बाजूस असलेल्या सैन्यापैकी प्रमुख सरदार हरि मोरेश्वर राजाज्ञा ह्यांनी ह्या संधीस लिहिलेले छ० ९ रमजान रविवार ( ता० ३ जानेवारी ३० स० १७३४)चें एक पत्र आह्मांस उपलब्ध झाले आहे. त्यावरून ह्या वेळच्या मराठी सैन्याच्या स्थितीची चांगली कल्पना करितां येते. हे पत्र येणेप्रमाणेंः- “श्रीमंत महाराज राजश्री छत्रपति स्वामींचे सेवेसीः- विनंति सेवक हरि मोरेश्वर राजाज्ञा कृतानेक विज्ञापना तागाईत छ० ९ रमजान रविवार मुकाम लाडवळ नजीक महाड महाराजांच्या कृपावलोकनें करून सेवकाचें व फौजेचें वर्तमान यथास्थित असे. विज्ञापना. जामुदाबरोबर आज्ञापत्र सादर केलें तें पावोन सनाथ जाहलों. पत्रीं आज्ञा कीं, “महाडचा कोट घ्यावा हें स्वामींस जरूर आहे; तर महाडास मोर्चेबंदी करून नार्के अस तील तेथें तोफा जोडून कोट जेर करणे. सावधपणे मनसबा करून स्थल हस्त- गत करणें. राजश्री वकाजी माहडिक याजवळून रसाळगड, मंडणगड व -