पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ , ह्यानंतर जंजिरा लवकर हस्तगत होत नाहीं असे पाहून, बाजीराव पेशवे यांनीं, दुसरे महत्त्वाचे राजकीय मनसवे साधण्याकरितां, जंजिन्याचा वेढा उठ विण्याचा विचार केला. त्याच संधीस सिद्दी अबदुल रहिमान हा तह कर ण्यास सिद्ध झाला. ह्मणून त्याच्याशीं तहाचीं कलम ठरवून बाजीराव ता० ११ डिसेंबर इ० स० १७३३ मध्यें सातान्यास गेले. सिद्दी रहिमान ह्याच्या हातीं मुळींच सत्ता नसल्यामुळे व सिद्दी सात प्रभृति जे हवशांचे प्रमुख सरदार होते त्यांची गर्वतृष्णा कमी न झाल्यामुळे, हा तह पुढे दोन वर्षेपर्यंत अमलांत आला नाहीं. बाजीराव पेशवे सातान्यास गेल्यानंतर प्रतिनिधि, भोसले, आंग्रे वगैरे सरदारांनी हवशांच्या ताब्यांतील अंजनवेल, गोवळकोट वगैरे मजबूत जागा घेण्याचा एकसारखा प्रयत्न चालविला होता; व शाहु महाराजांकडूनही त्यांस have been fruitless, if family dissensions, which so often thwart the best-matured designs of Native powers, had not intervened. Manajee and Sumbbajee became estranged from each other, to the great satisfaction of the President and Council, who at once resolved to foment their disputes. With that view, they sent to Colaba, Captain Inehbird, who had become better acquainted with the customs and languages of the Natives than all his contemporaries, and was in con- sequence the favourite diplomatist of the day. His instructions were simple; he was directed to assist Manajee with money and military stores, and “to take all opportunities of spiriting him up to carry on his resentments against his brother.” - Bombay Quarterly Review, १ हा तह मेजर टी. बी. जव्हस ह्यांनी आपल्या 'कोंकणवर्णन' पुस्तकांत दिला आहे. त्याची तारीख छ २ सावान सुदुरसन ११३३ ह्मणजे ता० ६ फेब्रु वारी इ० स० १७३३ ही दिली आहे. परंतु ती संशयात्मक दिसते. ह्या तहानें तळें, घोसाळें, निजामपूर, गोरेगांव, बिरवाडी आणि गोंवळे अर्धे असे ५॥ महाल पेशव्यांकडे आले.