पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, त्यांची मजी संपादन करण्याकरिता आपल्याकडील एक भला माणूस त्यांच्याकडे पाठविला. इकडे शाहु महाराजांनीं, सेखोजी आंग्रे ह्यास ता० १ सप्टेंबर इ० स० १७३३ रोजी पत्र पाठवून असे कळविले की, उंदेरीचा किल्ला शाम- लानें इंग्रजांस विकत दिला असेल तर तो पैसे देऊन आपण घ्यावा व इंग्रजांस कोलावण माफ करून त्यांशीं सख्य संपादावें. तात्पर्य, इंग्रजांची मदत हवशांस होऊं देऊं नये असा बाजीराव व शाहु महाराज ह्यांचा बेत होता. तो सेखोजी आंत्र्याच्या मार्फत सिद्धीस जाण्याचा संभवही होता. परंतु दुर्दैवानें सेखोजी आंग्रे लवकरच मृत्यु पावला, त्यामुळे तो बेत विसकटला. सेखोजीच्या मृत्यु- नंतर संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे ह्या बंधुद्रयामध्यें विरोध उत्पन्न झाला, व त्यामुळे जंजिन्यांच्या मसलतीस बराच पेंच पडलो. 1 “The first Wars and Treaties of the Western Presidency." - Bombay Quarterly Review. - २ कोलावणः - मराठ्यांच्या राज्यांतून जाण्याबद्दलचा परदेशीयांवरील कर. ३ संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे ह्यांच्या कलहामुळे मराठ्यांचे किती व कसे नुकसान झाले हैं येथे सांगणे अप्रस्तुत होईल. परंतु त्यांच्या कलहांत इंग्रजांचे हित अंतर्भूत असल्यामुळे त्यांनी त्यास पुष्टि दिली असें इंग्रज लेख- कांच्या लेखांवरून दिसून येतें. ह्या वेळच्या आंग्रे व हबशी ह्यांच्या सत्तेसं- बंधाने लिहितांना मि० अंडरसन यांनी लिहिले आहे:- "But the Siddees' prosperous days had passed; their power was on the wane, and of little assistance to the English in combatting the more formidable Angrias. So serious were the injuries inflicted by those pirates, and so heavy the ex- pense of fitting out ships to protect trade, that the Company were prevented from making their usual investments, and in their alarm even began to anticipate an extinction of their commerce in Western India. Emboldened by success, and looking for support from the Raja of Satara, the Angrias as- pired to bring all the Siddees' territories under their subjection, and possess themselves of every port on the coast between Bombay and Goa. Nor, in all probability, would their efforts